जळगाव : प्रतिनिधी
राहत्या घरामध्ये गळफास घेऊन दिलीप रामा सपकाळे (वय ५६, रा. सिद्धार्थ नगर) यांनी आत्महत्या केली. ही घटना १२ मार्च रोजी संध्याकाळी घडली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील सिद्धार्थ नगरमधील रहिवासी दिलीप सपकाळे हे पत्नी व मुलासह राहत होते. दि. १२ रोजी संध्याकाळी त्यांनी राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार पत्नीच्या लक्षात आल्यानंतर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ. कालसिंग बारेला करीत आहेत.



