Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » काय सांगता… खड्डयाचे जलपुजन, वृक्षारोपण करून उपोषणास प्रारंभ करणार : राजेंद्र वाघ
    धरणगाव

    काय सांगता… खड्डयाचे जलपुजन, वृक्षारोपण करून उपोषणास प्रारंभ करणार : राजेंद्र वाघ

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 19, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: गेल्या वर्षांपासुन धरणगाव सार्वजनिक बांधकाम विभागाने उड्डाण पुलापासून ते धरणी नाला पुलापर्यंत, शहरातील प्रमुख रस्त्याचे उद्घाटन होऊन काँक्रिटीकरणाचे व डिव्हाईडरची कामे सुरू करण्यात आली होती. मात्र सुरू असलेली कामे अर्धात थांबवून कामे बंद करण्यात आली व जे रस्ते तयार केलेत, त्या रस्त्यावरही मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे आजतागायत रस्त्यांचे कामे करण्यास धरणगाव बांधकाम उपविभाग असमर्थ ठरल्यामुळे माहिती अधिकार जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ व संघटनांच्या वतीने दि.२३ जुलै, २०२२ शनिवार पासून उपोषणास बसणार आहेत.

    २३जुलै रोजी शहरातील गूड शेफर्ड इंग्लिश स्कूल, उड्डाण पूल, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, बस स्थानक, व्हाईट हाऊस, मटन मार्केट, पारोळा नाका, पाटील वखार, भूमी गार्डन जवळील ( पाटाच्या पुलाजवळ ) रस्त्यात पडलेल्या खड्ड्यामधील पाण्याचे जलपुजन करून वृक्ष लावून आंदोलन करण्यात येणार आहे. तद्नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक जवळ उपोषणास बसणार आहे. गेल्या वर्षभरापूर्वी शहरातील प्रमुख रस्त्याचे उद्घाटन करून कामे सुरू करण्यात आली होती. मात्र सुरू असलेली कामे अर्ध्यात थांबवून कामे बंद करण्यात आली ती आजतागायत रस्त्यांचे व डिव्हाईडर ची कामे पूर्ण करण्यात आली नाही.

    सदर रस्त्याच्या व डिव्हाईडर चे कामासंदर्भात विचारणाबाबत मा. सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता सो, यांच्या कार्यालयात गेल्या आठ दिवसांपासून आम्ही निरंतर भेट घेण्याचा प्रयत्न केला परंतु, मा.अभियंता सो, मिळून आले नाहीत. यामुळे धरणगावातील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वाघ व सामाजिक संघटना यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबविला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    पाळधीत एका रात्रीत दोन घरफोड्या; दागिने-रोख रक्कम लंपास !

    March 12, 2026

    कुटुंब लग्नासाठी बाहेर, चोरट्यांनी साधला डाव; धरणगावात मोठी घरफोडी

    March 9, 2026

    बोर्ड परीक्षेत कॉपीचा मोठा भंडाफोड; सीसीटीव्हीमुळे 81 जणांवर कारवाई

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.