जळगाव : प्रतिनिधी
पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेलेल्या ६४ वर्षीय व्यावसायिकाचा चक्कर येवून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी मोहाडी रस्त्यावरील पेट्रोल पपंपावर घडली. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विरेंद्र रुढाभाई जैठवा (वय ६४, रा. रायसोनी नगर) यांचे शहरात किराणा दुकान आहे. ते बुधवारी दुपारी मोहाडी रस्त्यावरील पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेले होते. पेट्रोल भरत असताना त्यांना अचानक चक्कर येवुन ते खाली पडले. त्यांना नागरीकांनी उचलून खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुलगा वैभव याने जीएमसी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल गफुर तडवी हे करीत आहे



