Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भरधाव अर्टिगा कारने नागरिकांना उडवले; पाच जखमी, दोन नंबर प्लेटमुळे संशय वाढला
    क्राईम

    भरधाव अर्टिगा कारने नागरिकांना उडवले; पाच जखमी, दोन नंबर प्लेटमुळे संशय वाढला

    editor deskBy editor deskMarch 12, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुक्ताईनगर : प्रतिनिधी

    तालुक्यातील हरताळा फाट्यावर गुरुवारी सकाळच्या सुमारास भरधाव वेगाने आलेल्या अर्टिगा कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नागरिकांना जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जण जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. जखमींना तातडीने मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, अर्टिगा कार भरधाव वेगाने येत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नागरिकांवर जाऊन धडकली. या धडकेत प्रल्हाद काळू पाटील, सलीम शेख, काशीनाथ साळुंखे, मुरली कोळी आणि ज्ञानेश्वर कोळी हे जखमी झाले. अपघाताचा आवाज मोठा असल्याने परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

    दरम्यान, घटनेची माहिती मिळताच हरताळा येथील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप काळे यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून गावकऱ्यांच्या मदतीने जखमींना रुग्णवाहिकेद्वारे मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे जखमींना वेळेत वैद्यकीय मदत मिळाली. डॉक्टरांच्या प्राथमिक तपासणीत दोन जण गंभीर जखमी असून उर्वरित तिघांना किरकोळ ते मध्यम स्वरूपाच्या दुखापती झाल्याचे सांगण्यात आले.

    अपघातानंतर कारमधील चालक आणि त्याच्यासोबत असलेले सर्वजण घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे अपघातग्रस्त गाडीवर दोन वेगवेगळ्या नंबर प्लेट आढळून आल्या. तसेच गाडीत पोलिसांच्या काठ्या आणि पोलीस वर्दी सुद्धा सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.  घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक संदीप वानखेडे आणि पोलीस कॉन्स्टेबल दीपक ढाकरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसराची पाहणी करून अपघाताची नोंद घेतली असून फरार चालकाचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.

    या अपघातामुळे हरताळा फाटा परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. गाडीवरील दोन नंबर प्लेट आणि पोलिसांचा ड्रेस आढळून आल्याने या प्रकरणामागील नेमके कारण काय, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. पोलिसांच्या सखोल तपासानंतरच या घटनेमागील सत्य समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जम्मूमध्ये मोठा अनर्थ टळला : फारुख अब्दुल्लांवर गोळीबाराचा प्रयत्न

    March 12, 2026

    मनसे पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंचा इशारा ; “नवनिर्माण नावाला तरी साजेसे काम करा” !

    March 12, 2026

    मुंबई विधानभवनात सुरक्षिततेसह खळबळ; ई-मेलद्वारे धमकी आल्याने सतर्कता

    March 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.