Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बचत खात्यात शिल्लक कमी? दंडाबाबत मोठी माहिती समोर
    Uncategorized

    बचत खात्यात शिल्लक कमी? दंडाबाबत मोठी माहिती समोर

    editor deskBy editor deskMarch 11, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    बचत खात्यात किमान शिल्लक (मिनिमम बॅलन्स) न ठेवल्यास आकारल्या जाणाऱ्या दंडाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. या संदर्भात केंद्र सरकारने लोकसभेत महत्त्वाची माहिती दिली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आर्थिक वर्ष २०२२-२३ ते २०२४-२५ या कालावधीत मासिक सरासरी शिल्लक न ठेवणाऱ्या खातेदारांकडून दंडाच्या स्वरूपात तब्बल ८,०९२.८३ कोटी रुपये वसूल केल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत दिलेल्या लिखित उत्तरात ही माहिती दिली. लोकसभेत खासदार सुरेश कुमार शेतकर  आणि सौगत रॉय यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्यांनी बँका किमान शिल्लक न ठेवल्यास किती दंड वसूल करतात आणि हा नियम रद्द करण्याबाबत सरकार काही विचार करत आहे का, अशी विचारणा केली होती.

    अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केले की, बचत खात्यात किमान शिल्लक न ठेवल्यास दंड आकारू नये, असे कोणतेही थेट निर्देश केंद्र सरकारने बँकांना दिलेले नाहीत. मात्र बँकिंग सेवा अधिक ग्राहकाभिमुख करण्यासाठी अनेक सरकारी बँकांनी स्वतःहून काही शुल्क माफ करण्याचा किंवा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

    सरकारने दिलेल्या माहितीनुसार, दंडातून मिळालेली ही रक्कम सार्वजनिक बँकांच्या एकूण उत्पन्नाच्या तुलनेत अत्यल्प आहे. गेल्या तीन आर्थिक वर्षांत दंडातून मिळालेला महसूल बँकांच्या एकूण उत्पन्नाच्या सुमारे ०.२३ टक्के इतकाच असल्याचे सरकारने नमूद केले आहे.

    ग्राहकांना अधिक सोयी-सुविधा देण्याच्या दृष्टीने काही बँकांनी मिनिमम बॅलन्सवरील दंड पूर्णपणे माफ केला आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ने मार्च २०२० पासून बचत खात्यात किमान शिल्लक न ठेवल्यास आकारला जाणारा दंड रद्द केला आहे. त्यानंतर अर्थ मंत्रालयाच्या निर्णयानुसार २०२५ मध्ये आणखी नऊ सरकारी बँकांनीही हे शुल्क पूर्णपणे माफ केले, तर काही बँकांनी दंडाची रक्कम कमी केली आहे.

    मिनिमम बॅलन्सच्या नावाखाली आकारल्या जाणाऱ्या दंडामुळे ग्राहकांमध्ये नाराजी असल्याचेही समोर आले आहे. विशेषतः खासगी बँकांच्या बाबतीत हा मुद्दा अधिक संवेदनशील मानला जातो. यापूर्वी ज्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला आहे, त्यांना ती रक्कम परत देण्याबाबत सरकारने अद्याप कोणताही स्पष्ट निर्णय जाहीर केलेला नाही. दरम्यान, या विषयावर पुढील काळात बँकिंग क्षेत्रात ग्राहकाभिमुख धोरणांबाबत आणखी निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    प्रशासकीय राजवटीतील निर्णयांवर श्वेतपत्रिका जाहीर करा नगरसेविका वैशाली अमित पाटील

    March 5, 2026

    समस्यांचा बॅकलॉग उघड! प्रभाग १३मध्ये प्रशासनाला अल्टिमेटम

    February 18, 2026

    प्रतोदपदी डॉ. चंद्रशेखर पाटील यांची निवड; भाजपाच्या गटनेतापदी प्रकाश बालाणी

    January 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.