Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दक्षता पेट्रोलपंप घोटाळा : उपनिरीक्षक वाघांकडून मुलाच्या खात्यात 10 लाख; सोन्याची खरेदी उघड
    क्राईम

    दक्षता पेट्रोलपंप घोटाळा : उपनिरीक्षक वाघांकडून मुलाच्या खात्यात 10 लाख; सोन्याची खरेदी उघड

    editor deskBy editor deskMarch 11, 2026No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    पोलीस दलाच्या वेल्फेअरअंतर्गत चालविल्या जाणाऱ्या दक्षता पेट्रोलपंपावरील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात महत्त्वाचा खुलासा झाला आहे. उपनिरीक्षक वाल्मिक वाघ यांनी अपहार झालेल्या काळात आपल्या मुलाच्या खात्यात तब्बल १० लाख रुपये ट्रान्सफर केल्याचे तपासात समोर आले आहे. यानंतर त्यांनी सोने खरेदी केल्याचेही उघड झाले असून अपहाराची रक्कम सोने किंवा अन्य कोणाच्या नावावर मालमत्ता खरेदीसाठी वापरली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तपास अधिकारी पोनि राहुल गायकवाड यांनी ही माहिती न्यायालयासमोर मांडली. त्यानुसार न्यायालयाने संशयित वाघ यांना १३ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

    पोलीस दलातील वेल्फेअरतर्फे चालविण्यात येणाऱ्या दक्षता पेट्रोलपंपावर व्यवस्थापक म्हणून पीएसआय वाल्मिक वाघ यांची नियुक्ती करण्यात आली होती. १२ फेब्रुवारी रोजी ते अचानक बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या मुलाने पोलिसांना एक चिठ्ठी दिली होती. वाघ बेपत्ता झाल्यानंतर पेट्रोलपंपाच्या दैनंदिन व्यवहारांचे ऑडिट करण्यात आले. ऑडीटरच्या अहवालानुसार गेल्या तीन महिन्यांत पेट्रोलपंपाच्या व्यवहारात तब्बल १ कोटी ३३ लाख रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले. त्यानुसार वाघ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुमारे महिनाभर पोलिसांना गुंगारा दिल्यानंतर वाघ हे सोमवारी स्वखुशीने पोलिसांसमोर शरण आले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

    दरम्यान, अपहाराच्या १ कोटी ३३ लाख रुपयांबाबत वाघ तपासात सहकार्य करत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यांच्या स्वतःच्या बँक खात्यात केवळ २५० रुपये शिल्लक असल्याचे तपासात आढळले. अपहारातील रक्कम कोठे गुंतवली, कोणाच्या स्वाधीन केली किंवा मालमत्ता खरेदीसाठी वापरली का, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध पोलिस घेत आहेत. या कारणास्तव वाघ आणि त्यांचा मुलगा शेखर वाघ या पिता-पुत्रांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

    संशयित वाघ यांचे वकील अॅड. अकील इस्माईल यांनी न्यायालयात सांगितले की, पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी वडिलांनी मुलाच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले होते आणि ते मुलाने काढले. त्यामुळे मुलाला या गुन्ह्यात गोवणे योग्य नाही. शेखर वाघ याचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसून तो सुरुवातीपासून पोलिसांच्या संपर्कात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच खासगी ऑडीटरच्या अहवालावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून वाघ यांच्याकडून स्पष्टीकरण न मागताच गुन्हा दाखल केल्याचा आरोपही त्यांनी केला.

    तपासादरम्यान असेही समोर आले की, बेपत्ता होण्यापूर्वी ८ फेब्रुवारी रोजी वाघ कुटुंबियांना भेटले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी १० ग्रॅम सोने खरेदी करून मुलाकडे दिले. १० फेब्रुवारी रोजी बेपत्ता झाल्यानंतर त्यांनी घरी पाठविलेल्या सुसाईड नोटमध्ये वरिष्ठांकडून त्रास दिला जात असल्याचा उल्लेख केला होता. वडिलांनी केलेल्या अपहाराबाबत मुलाला माहिती होती, मात्र ती त्याने पोलिसांपासून लपविल्याचा दावा तपास अधिकारी पोनि राहुल गायकवाड यांनी न्यायालयात केला.

    दरम्यान, चौकशीत वाघ यांनी कोट्यवधींचा नव्हे तर केवळ १० ते १५ लाख रुपये घेतल्याचे पोलिसांना सांगितले आहे. मात्र त्यांच्या खात्यातून मुलाच्या खात्यात १० लाख रुपये ट्रान्सफर झाल्याचे आणि ते मुलाने बँकेतून काढल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. त्यामुळे अपहाराच्या रकमेचा नेमका माग काढण्यासाठी पोलिसांचा तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जेवणासाठी उतरले… अन् एसटी बस पेटली : ५० प्रवासी थोडक्यात बचावले

    March 11, 2026

    चार वर्षीय चिमुकलीवर मामाने केला अत्याचार : संतप्त जमावाने रोखला महामार्ग !

    March 11, 2026

    जळगावातील हॉटेलात अत्याचार करीत केला गर्भपात !

    March 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.