जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथील रस्त्यांची दयनिय अवस्था झाली असून तातडीने रस्त्यावरील डागडुजी करून उपाययोजना करावी अशी मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नशिराबाद नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना मंगळवारी १९ जुलै रोजी सकाळी देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून नशिराबाद शहरात पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शहरातील विकसित झालेल्या वाढीव वस्त्या, उपनगरातील रहिवाशांना यामुळे फारच त्रास सहन करावा लागत आहे. विविध समस्यांपैकी प्रामुख्याने भेडसावते, ती रस्त्यांची समस्या या उपनगरातील तसेच वाढीव वस्त्यांतील रस्ते कच्चे असल्याने, त्या ठिकाणी साधे खडीकरणही नसल्याने पावसाच्या पाण्यामुळे चिखल होत असून नागरिकांना ये-जा करणे त्रासदायक होत आहे. या रस्त्यांनी चालणे तसेच दुचाकी गाड्या चालवणे ही कठीण झाले आहे.
नागरिक नगर परिषदेचा कर हा नियमित भरणारे असून मात्र सुविधा मिळत नसल्याने कमालीचे नाराज आहेत. शहरातील वस्त्यांमध्ये रस्त्यांची स्थिती बघता अंदाजे २ हजार ब्रास मुरूमाची कमीत कमी व्यवस्था नगरपरिषद प्रशासनातर्फे झाल्यास तात्पुरती उपाययोजना होण्यास मदत होईल.
नागरिकांना इतर सुविधा देण्यासह चांगल्या दर्जाच्या रस्त्याची सोय निर्माण करणे, हे देखील स्थानिक प्रशासन म्हणून आपले कर्तव्य आहे. यासाठीची लागणारे काय ती उपाययोजना व पूर्तता येत्या 8 दिवसात पूर्ण करून नशिराबाद शहरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी वाढीव वस्त्यातील उपनगरातील तसेच कच्चा रस्त्यावर मुरूम टाकण्यास सुरुवात करावे. अन्यथा 8 दिवसानंतर नगरपरिषद नशिबात येथे व्यापक व तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.


