Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ‘त्या’ पेट्रोलपंपाचे व्यवस्थापक उपनिरीक्षक आले पोलिसांना शरण !
    क्राईम

    ‘त्या’ पेट्रोलपंपाचे व्यवस्थापक उपनिरीक्षक आले पोलिसांना शरण !

    editor deskBy editor deskMarch 10, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    पोलिस दलाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या दक्षता पेट्रोलपंपावरील अपहार प्रकरणात पसार असलेले पेट्रोलपंपाचे व्यवस्थापक उपनिरीक्षक वाल्मीक मधुकर वाघ हे अखेर पोलिसांना शरण आले. सोमवारी (९ मार्च) त्यांना व त्यांचा मुलगा शेखर वाघ याला अटक करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  पोलिस दलाच्या मानव संसाधन विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या दक्षता पेट्रोलपंपाच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांची जबाबदारी व्यवस्थापक म्हणून वाल्मीक वाघ यांच्याकडे होती. त्यांनी १ कोटी ३३ लाख ७५२ रुपयांचा अपहार केल्याचे समोर आल्यानंतर अपहरण व फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी त्यांच्या बँक खात्याची चौकशी केली. यामध्ये अपहार काळात मोठ्या प्रमाणात रक्कम ट्रान्सफर झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

    वाल्मीक वाघ हे पसार असल्याने त्यांच्या शोधार्थ वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली होती. ९ मार्च रोजी ते स्वतः स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाले. त्यांची पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, तपासाधिकारी राहुल गायकवाड यांनी चौकशी केली. चौकशीत वाघ हे इतक्या मोठ्या रकमेचा नव्हे तर केवळ दहा ते पंधरा लाख रुपयांचा अपहार केल्याचे सांगत आहे. पोलिसांकडून देखील वाघ यांनी इतकी मोठी रकमेची विल्हेवाट कशी लावली, अपहाराची रक्कम कशा पद्धतीने हस्तगत करता येऊ शकते याबाबत चौकशी केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026

    २२ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

    March 10, 2026

    विम्यासाठी अपघाताचा रचला बनाव : वैद्यकीय अधिकाऱ्यासह ८ जणांना अटक !

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.