लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: गेल्या अनेक दिवसांपासून रामदास कदम नाराज असल्याची चर्चा होती. शिवसेना नेते रामदास कदम यांनी अखेर आपल्या नेतेपदाचा राजीनामा देत रामराम ठोकला. भावूक होत रामदास कदम यांनी आपल्या भावना व्यक्त केला. शिवसेनेत तेढा निर्माण झाल्याने आता सर्वांचे लक्ष धनुष्य बाणाचा चिन्हावर लागले आहे.
52 वर्षे मी कामं केलं पण माझ्यावर नेतेपदाचा राजीनामा देण्याची वेळ येईल असं कधी स्वप्नात देखील वाटलं नव्हतं.पक्षाच्या कारवाईनंतर मी खूप अस्वस्थ असून, राजीनामा दिल्याने मी समाधानी नाही. “आज शिवसेना प्रमुख असते तर तुम्हाला राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाऊन मुख्यमत्री होऊ दिलं असतं का? हे तुमच्या मनाला विचारून पाहा. बाळासाहेबांनी आपल्यासाठी कोणतंही पद घेतलं नाही.
भाजपनं २५ वर्षे आपल्याला सडवली म्हणता, त्यांना २५ वर्ष लागली, पण यांनी अडीच वर्षात आपली वाट लावून टाकली त्याचं काय?,” असा प्रश्न रामदास कदम यांनी केला. अजित पवारांनी अडीच वर्षांत वाट लावली त्याचा अभ्यास कोण करणार? असंही ते म्हणाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, शरद पवारांनी डाव साधला, पक्ष फोडल्याचे टीकास्त्र त्यांनी सोडलं.