शिंदे गटातील 3 नगरसेवक भाजपमध्ये दाखल
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शिवसेनेशी बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. शिंदे गटामध्ये आमदार आणि खासदारांचा प्रवेश सुरू असताना, अशातच भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांना धक्का दिला आहे. पण नवी मुंबईमध्ये भाजपनेच शिंदे गटाला धक्का दिला आहे. राज्यातील सामान्य नागरिक या सर्व घटनांना वैतागून गेली आहे.
शिंदे गटातील 3 नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करून सेनेला हादरा दिला होता परंतु तीच वेळ शिंदेंच्या वाटेला आली. नवीन गवते, अपर्णा गवते आणि दीपा गवते हे पुन्हा एकदा भाजपमध्ये दाखल झाले आहे. आमदार गणेश नाईक यांच्या उपस्थितीत गवते यांनी पक्ष प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत या तिन्ही नगरसेवकांनी शिवबंधन बांधले होते. पण, आता राज्यात पुन्हा शिंदे आणि भाजपचे सरकार आल्यामुळे तिन्ही नगरसेवकांनी भाजपमध्ये घरवापसी केला आहे.
राज्यातील राजकारण एका वेगळ्याच मार्गावर चालेलं आहे. तसेच राज्यात सध्या फोडाफोडीचं राजकारण घडताना दिसत आहे. एकीकडे उद्धव ठाकरे यांनी हाकालपट्टी केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटात नियुक्त्या करून मोठ्या जबाबदा-या देताना दिसत आहेत. शिवसेनेतून भाजपमध्ये आलेले गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे गटालाच धक्का दिला आहे. अशातच शिंदे गटातील 3 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.