Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सोनवद येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ संपन्न; विविध योजनांचे प्रत्यक्ष वाटप
    धरणगाव

    सोनवद येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ संपन्न; विविध योजनांचे प्रत्यक्ष वाटप

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रMarch 7, 2026Updated:March 7, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव (प्रतिनिधी) – महसूल व वन विभागाच्या दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांच्या दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी तसेच शासनाच्या विविध विभागांशी संबंधित तक्रारी तातडीने निकाली काढण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मंडळ स्तरावर ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


    या अनुषंगाने धरणगाव तालुक्यातील सोनवद मंडळात प्राथमिक आरोग्य केंद्र, सोनवद बु. येथे शनिवार, ७ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ वाजता हे शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते, तसेच जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध शासकीय योजनांचे लाभ नागरिकांना प्रत्यक्ष वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे उपस्थित नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.


    या शिबिरात विविध योजनांअंतर्गत मोठ्या प्रमाणावर लाभ वितरित करण्यात आले. त्यामध्ये जात प्रमाणपत्र १४४, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र ११८, नवीन रेशन कार्ड २७, संजय गांधी योजना मंजूर प्रकरणे २८, वारस फेरफार ४२, कालबाह्य नोंदी कमी करणे ६३०, आयुष्मान भारत कार्ड ९, घरकुल लाभार्थी नमुना-८ चे १८ प्रकरणे यांचा समावेश होता. तसेच कृषी विभागांतर्गत कांदा चाळ पूर्वसंमती २, पॅक हाऊस पूर्वसंमती १, शेततळे पूर्वसंमती १ देण्यात आली.
    याशिवाय भूमी अभिलेख विभागामार्फत ८ गावांतील एकूण २८४० ड्रोन सर्वे सनदांचे वाटप करण्यात आले.


    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील पाटील यांनी केले तर प्रास्ताविक तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी केले. या अभियानामुळे धरणगाव तालुक्यातील शेतकरी, महिलावर्ग, दिव्यांग आणि दुर्बल घटकांना थेट न्याय मिळाला असून, सेवा पंधरवड्यातील हे वाटप शासन आणि जनतेतील दुवा ठरल्याची भावना लाभार्थ्यांनी व्यक्त केली.


    या कार्यक्रमास जिल्हाधिकारी रोहन घुगे, उपविभागीय अधिकारी (एरंडोल) मनीषकुमार गायकवाड, तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी देसाई, वाघ, उपअधीक्षक भूमी अभिलेख रेखा तायडे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


    तसेच सोनवद बु. सरपंच उज्ज्वला पाटील, प्रेमराज पाटील, दिलीप अण्णा धनगर, निर्दोष पवार, चंद्रशेखर भाटिया, दामू पाटील, रवींद्र हरणे (पो.पा.) यांच्यासह पदाधिकारी, लाभार्थी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    धरणगाव–एरंडोल रस्ता धुळीत गाडला; हजारो नागरिकांचा जीव धोक्यात!

    March 4, 2026

    भीषण अपघात : उभ्या ट्रकला कारची धडक; धरणगावचे ७ जण गंभीर

    March 3, 2026

    दाखले, फेरफार, ७/१२ — सगळं एका दिवसात; ७ मार्चला सोनवद येथे महाराजस्व समाधान शिबीर

    March 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.