Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » व्यापाऱ्याची १० लाखांची फसवणूक करणारे दोघे जेरबंद !
    क्राईम

    व्यापाऱ्याची १० लाखांची फसवणूक करणारे दोघे जेरबंद !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रAugust 21, 2021Updated:August 21, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ;- यावल तालुक्यातील दहीवद येथील व्यापाऱ्याला गॅसची डिलरशीप देण्याचे आमिष दाखवून १० लाख ३० हजाराची ऑनलाईन फसवणूक करणारेदोन भामट्याना सायबर पोलीसांनी अटक केली आहे.संशयित आरोपी सुनिल कुमार सहानी पिता ब्रम्हदेव उर्फ अनिल कुमार वय-३८ रा. गुनाबस्ती पोस्ट तेजपूर जिल्हा समस्तीपुर (बिहार), कन्हैय्या सहानी पिता राजेंदर सहानी वय-४३ रा. बेलीया घाट मेन रोड कलकत्ता यांना अटक केलेल्यांची नावे आहेत .

    यावल तालुक्यातील दहीगाव येथील रहिवाशी कालीदास विलास सुर्यवंशी वय-३३ रा. दहीगाव ता. यावल जि.जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. १८ डिसेंबर २०२० ते ३० डिसेंबर २०२० दरम्यान एका अनोळखी नंबरवरून फोन येवून आशितोष कुमार असे बनावट नाव सांगून उज्जवला गॅस एजन्सीची डिलरशिप देते असे सांगून बनावट कागदपत्रे खरे भासविले. तसेच उज्जवला गॅस एजन्सी नावाचे बनावट ऑनलाईन पोर्टल बनविले होते. त्यांनी वेगवेगळे कारणे सांगून कालीदास सुर्यवंशी यांच्या खात्यातून एकुण १० लाख ३३ हजार रूपये लंपास गेल्याचे समोर आले होते. याप्रकरणी कालीदास सुर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा शोध लावून सायबर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांच्या पथकाने वरील दोघांना अटक केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.