Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वऱ्हाडींच्या गर्दीत चोरट्यांचा डाव; नववधूचे दागिने चोरून मध्यप्रदेशात पळाले, दोघांना बेड्या
    क्राईम

    वऱ्हाडींच्या गर्दीत चोरट्यांचा डाव; नववधूचे दागिने चोरून मध्यप्रदेशात पळाले, दोघांना बेड्या

    editor deskBy editor deskMarch 6, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी

    लग्नसमारंभात वऱ्हाडी असल्याचे भासवून शिरलेल्या चोरट्यांनी नववधूच्या दागिन्यांची पर्स चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यप्रदेशातील राजगढ येथे तब्बल दहा दिवस ठाण मांडत दोन संशयित आरोपींना अटक केली. रितीक सिकंदर सिसोदीया आणि कृषी निरज बेडीया (दोघे रा. कडिया सांसी, तहसील नरसिंहपूर, जि. राजगढ, मध्यप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, त्यांच्याकडून १ लाख ९२ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    भुसावळ येथील बालाजी लॉन्स येथे ६ फेब्रुवारी रोजी उज्ज्वला प्रबोध भावे यांच्या मुलाचा विवाह सोहळा पार पडत होता. दुपारी सुमारे ४ वाजेच्या सुमारास नववधूचे दागिने असलेली पर्स सोफ्यावर ठेवण्यात आली होती. त्याचवेळी अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत ही पर्स लंपास केली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    या घटनेची दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार उपनिरीक्षक शरद बागल, उपनिरीक्षक रवी नरवाडे, पोहेकॉ गोपाल गव्हाळे, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे आणि प्रमोद ठाकूर यांच्या पथकाने तपास सुरू केला.

    पोलिसांनी लॉन्समधील सीसीटीव्ही फुटेज तसेच लग्नसमारंभात चित्रीत करण्यात आलेल्या व्हिडिओंचे बारकाईने विश्लेषण केले. तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी मध्यप्रदेशातील राजगढ जिल्ह्यातील कडिया सांसी येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांचे पथक मध्यप्रदेशात रवाना झाले. राजगढ येथे पोलिसांनी तब्बल दहा दिवस तळ ठोकून रितीक सिकंदर सिसोदीया आणि कृषी निरज बेडीया या दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान चोरलेल्या दागिन्यांपैकी काही दागिने कृषी बेडीया याने गावाला जात असल्याचे सांगत आपल्या मावशीच्या पती निरोत्तम सिसोदीया याच्याकडे ठेवले असल्याचे समोर आले. पोलिसांनी आरोपींकडून सुमारे ४० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत तसेच चांदीच्या लवंगा असा एकूण १ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे लग्नसमारंभातील चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    धक्कादायक : तरुणीचा तोल गेल्याने विहिरीत पडून मृत्यू !

    March 6, 2026

    दोन दुचाकींच्या धडकेत तरुण ठार !

    March 6, 2026

    वर्षभरासाठी सहा जणावंर हद्दपारीची कारवाई

    March 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.