Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सासरच्या मानसिक त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; सुसाइड नोटमुळे खळबळ
    क्राईम

    सासरच्या मानसिक त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; सुसाइड नोटमुळे खळबळ

    editor deskBy editor deskMarch 5, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सासू, साली व साडूविरुद्ध गुन्हा दाखल; पैशांच्या तगाद्यामुळे टोकाचा निर्णय घेतल्याचा उल्लेख

    एरंडोल : प्रतिनिधी 

    एरंडोल तालुक्यातील भातखेडा येथील एका तरुणाने सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गौरव ज्ञानेश्वर बडगुजर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत सासरच्या लोकांकडून होत असलेल्या त्रासाचा उल्लेख केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, गौरव बडगुजर हे काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होते. सासरच्या मंडळींकडून वारंवार पैशांची मागणी केली जात होती तसेच धमक्याही दिल्या जात असल्याचे त्यांनी आपल्या सुसाइड नोटमध्ये नमूद केले आहे. या मानसिक छळामुळेच टोकाचा निर्णय घेत असल्याचे त्यांनी चिठ्ठीत लिहिले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी कासोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत गौरव बडगुजर यांच्या सासू अनिता बडगुजर, साडू भटू गरुड आणि साली गौरी गरुड यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

    घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी घटनास्थळावरून सुसाइड नोट जप्त केली असून या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बसस्थानकावर पोलिसाचा धिंगाणा; शासकीय कामात अडथळा, चालकाला मारहाण

    March 5, 2026

    नातवावर आजीची क्रूरता ; रंग उडवला म्हणून उकळते पाणी ओतले !

    March 5, 2026

    आव्हाने येथील युवकाचा गिरणा नदीपात्रात बुडून अंत

    March 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.