“काळ आला पण वेळ आली नाही”
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: पहाटे इंदूरवरून अमळनेर येथे येणारी अमळनेर डेपोची बस ही मध्यप्रदेशातील खरगोन आणि धार जिल्ह्याच्या सीमेनजीक नर्मदा नदीत कोसळून दुर्घटना घडली. “काळ आला पण वेळ आली नाही” कळमसरे येथील दर्शन मोतीलाल चौधरी हा युवक देखील अपघात झालेल्या इंदोर -अमळनेर याच बसने प्रवास करणार होता. काळजी घेणाऱ्या बहिणीच्या वेडी मायेने दर्शन चौधरीचे जीव वाचवला.
सकाळी पाऊस सुरू असल्याने त्याला बहिणीने थांबविले नसते तर वाईट घटना दर्शनसोबत झाली असती. कळमसरे येथील रहिवासी दर्शन चौधरी हा गेल्या एक आठवडा इंदोर येथे असलेल्या बहिणीला भेटायला गेला होता. बरेच दिवस झाल्याने त्यानुसार अमळनेर- इंदोर बसने सकाळी येतो; असे त्याने आपल्या वडिलांना सांगितले. सकाळीच या बसने यायला निघाला असताना बहिणीने पाऊस सुरु आहे. उशिरा निघ सांगत दर्शनला थांबविले. ही घटना घडल्याने एकुलता एक भाऊ आज बहिणीच्या काळजीने अपघातातून वाचला. दर्शनवरील मोठं संकट टळले आहे.
उशिराने गावाकडे निघालेला दर्शन कळमसरे येथे पोहचल्याने त्याला भेटण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. आपल्या मोठ्या बहिणीने आणि पाहुण्यांनी आज आग्रह केला नसता तर हा दिवस पाहता आला नसता. आई वडिलांना मिठी मारीत अश्रू अनावर झाले होते. तर काळजीने चौकशी करता सारा गाव गोळा झाला.