लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे खासदार, आमदार आणि पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहे. अनेक दिवसांपासून नाराज असलेले शिवसेनेचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे.रामदास कदम यांनी शिवसेनेबद्दल आपली नाराजी पत्रात दाखवली आहे.
शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी आज शिवसेनेला रामराम केला आहे. कदम यांनी एक पत्र लिहून आपण नेतेपदाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले आहे. ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझी शिवसेना नेतेपदी नियुक्ती केली होती. बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेना नेते पदाला कुठल्याही प्रकारची किंमत दिली नाही. हे मला पाहण्यास मिळाले, अशी टीका कदम यांनी केली.
शिवसेना नेत्यांना विश्वासात घेऊन काम कधीच झालं नाही. उलटपक्षी मला आणि माझ्या मुलगा आमदार योगेश कदम याला अपमानीत करण्यात आले . तर कोणीही टीका केली , काहीही पक्षावर काही बोलले, मातोश्रीवर कोण काही बोललं तरी आपण मीडियासमोर अजिबात जायचे नाही, असे आदेश दिले होते. आज पर्यंत सर्व गप्प बसून सहन करत राहिलो, आता नाही.
अशी टीकाही कदम यांनी केली.