जळगाव : प्रतिनिधी
भाचीच्या लग्नासाठी आत्याने घरात ठेवलेले २ लाख ८ हजार रुपयांचे दागिने भाच्यानेच लांबविले. हा प्रकार २६ फेब्रुवारी रोजी राजीव गांधी नगरमध्ये उघडकीस आली. या प्रकरणी १ मार्च रोजी तीन जणांना अटक करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजीव गांधी नगरमधील सुनीता वामन लोंढे (३४) यांनी भाचीच्या लग्नासाठी २ लाख ८ हजार रुपये किमतीचे दागिने पेटीत ठेवले होते. २६ फेब्रुवारी रोजी त्यांना दागिने ठेवलेली पेटी दिसली नाही. त्याविषयी त्यांनी भाचीला विचारला केली असता मध्यरात्री समाधान लोंढे हा घराच्या बाहेर जाताना दिसल्याचे सांगितले. समाधानला विचारणा केली असता त्याने मित्रांसह पेटी व त्यातील दागिने नेल्याचे सांगितले. त्याच्याकडे मागणी करूनही त्याने दागिने दिले नाही. त्यावरून समाधान लोंढे, प्रेम सकट, निखिल हातग या तीन जणांना पोहेकॉ जितेंद्र राठोड, सुशील चौधरी, जितेंद्र राजपूत, नीलेश पाटील यांनी अटक केली. साहील अवचारे हा पसार झाला आहे.



