Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चाकूचा धाक दाखवून चौघांनी रक्कम लांबविली !
    क्राईम

    चाकूचा धाक दाखवून चौघांनी रक्कम लांबविली !

    editor deskBy editor deskMarch 3, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    रावेरला सोडतो असे सांगून कारमध्ये बसवून घेत सलमान खान अमानउल्ला खान (५२, रा. निंभोरा, ता. रावेर) यांना चाकूचा धाक दाखवून चार जणांनी खिशातून ९ हजार ७०० रुपये काढून घेतले. ही घटना २८ फेब्रुवारी रोजी अजिंठा चौफुली ते प्रीतम पार्क दरम्यान घडली. याप्रकरणी १ मार्च रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील कारचालक शंभू सुभाष पाटील (३२, रा. पिंप्राळा) याला अटक करून कार जप्त केली.

    स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शरद बागल, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ विजय पाटील, अक्रम शेख नितीन बाविस्कर, किशोर पाटील, रवींद्र कापडणे, राहुल रगडे, छगन तायडे, प्रदीप चवरे यांनी तांत्रिक माहिती संकलित केली.
    त्यानुसार कारचालक शंभू पाटील याला अटक केली व गुन्ह्यात वापरलेली कार पोलिसांनी जप्त केली.

    रावेर तालुक्यातील निंभोरा येथील सलमान खान हे २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास रावेर येथे जाण्यासाठी अजिंठा चौफुली परिसरात उभे होते. त्यावेळी एका कारचालकाने १०० रुपये द्या, तुम्हाला रावेरला सोडतो असे सांगून खान यांना कारमध्ये बसवून घेतले.
    काही अंतरावर गेल्यानंतर कारमध्ये मागच्या सीटवर बसलेल्यांनी सलमान खान यांचे हात पकडून ठेवले तर एकाने चाकूचा धाक दाखवून त्यांच्या खिशातून ९ हजार ७०० रुपये जबरदस्तीने काढून घेत खाली उतरवून दिले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई

    March 3, 2026

    मध्यपूर्वेत युद्धज्वाला; दुबई विमानतळ ठप्प, प्रवाशांचा थरारक अनुभव

    March 3, 2026

    भाचीच्या लग्नातील दागिन्यांवर भाच्याचाच डल्ला; तिघांना अटक

    March 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.