Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » “सर्वोच्च न्यायालयाच्या अटक वॉरंट”ची धमकी; १८ लाखांची सायबर लूट !
    क्राईम

    “सर्वोच्च न्यायालयाच्या अटक वॉरंट”ची धमकी; १८ लाखांची सायबर लूट !

    editor deskBy editor deskMarch 2, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल असल्याची व सर्वोच्च न्यायालयातून अटक वॉरंट निघाल्याची खोटी भीती दाखवून सायबर गुन्हेगारांनी संरक्षण खात्यातील सेवानिवृत्त अभियंत्याची तब्बल १८ लाख २१ हजार ८२७ रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार १७ ते २७ फेब्रुवारीदरम्यान घडला. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  मनोहर वसंत चौधरी (७१, रा. कोथळी, ता. मुक्ताईनगर) हे केंद्र सरकारच्या संरक्षण खात्याच्या पुणे कार्यालयातून सहायक अभियंता म्हणून सेवानिवृत्त झाले असून सध्या शेती करतात. १७ फेब्रुवारी रोजी त्यांना अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. त्यांच्या नावाच्या आधारकार्डवर एक सिमकार्ड सुरू असून त्याद्वारे गैरप्रकाराचे मेसेज व्हायरल होत असल्याने क्राईम ब्रँचमध्ये गुन्हा दाखल झाल्याचे सांगण्यात आले.

    यानंतर काही वेळातच पोलिस गणवेशातील व्यक्तीने व्हिडिओ कॉल करून नाशिक येथील एका बँकेत त्यांच्या आधारकार्डवर खाते उघडून मोठ्या प्रमाणात अपहाराची रक्कम जमा झाल्याचा आरोप केला. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातून अटक वॉरंट निघाल्याचे खोटे सांगून त्यांना घाबरवण्यात आले.

    १८ फेब्रुवारी रोजी पुन्हा संपर्क साधून “दोन वाजेपर्यंत अटक केली जाईल” अशी धमकी देण्यात आली. व्हॉट्सअॅपवर बनावट कागदपत्रे पाठवून विश्वासार्हतेचा आव आणण्यात आला. तसेच, “आम्हाला न विचारता कुठेही जाऊ नका” व “दर दोन तासांनी ‘आम्ही सुरक्षित आहोत’ असा मेसेज पाठवा” अशा सूचना देण्यात आल्या. धमकीमुळे घाबरलेल्या चौधरी यांनी आपल्या विविध बँक खात्यांची माहिती, त्यातील शिल्लक रक्कम, घर व आठ एकर शेतीबाबत माहिती दिली. “या प्रकरणात बँक अधिकारी, पोलिस अधिकारी सामील असल्याने भारत सरकारने माहिती गुप्त ठेवण्यास सांगितले आहे,” असेही आरोपींनी सांगितले.

    २० फेब्रुवारी रोजी पुन्हा कॉल करून “केसमधून बाहेर पडण्यासाठी” पैशांची मागणी करण्यात आली. त्यानुसार मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील खात्यात ३ लाख १० हजार २८३ रुपये आणि उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील खात्यात २ लाख १ हजार २८३ रुपये जमा करण्यास सांगण्यात आले. २४ फेब्रुवारी रोजी पुन्हा फोन करून सोने तारण ठेवून रक्कम पाठविण्याचा दबाव टाकण्यात आला. अशा प्रकारे २७ फेब्रुवारीपर्यंत एकूण १८ लाख २१ हजार ८२७ रुपये आरोपींनी उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर चौधरी यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित बँक खात्यांचा मागोवा घेण्याचे काम सुरू आहे.

    पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, पोलिस किंवा न्यायालयाच्या नावाने फोन करून पैसे मागितल्यास त्वरित पडताळणी करावी. कोणतीही वैयक्तिक किंवा बँक माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नये. संशयास्पद कॉल आल्यास तात्काळ सायबर हेल्पलाईन १९३० वर संपर्क साधावा.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    नवीन बायपासवर पहाटेचा भीषण अपघात; सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

    March 2, 2026

    पाणी भरण्याचा प्रयत्न ठरला जीवघेणा; विजेच्या धक्क्याने १४ वर्षीय धिरजचा मृत्यू

    March 2, 2026

    जळगावात १३ वर्षीय मुलीवर अत्याचार !

    March 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.