Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » फैजपूर तालुक्यात खळबळ; १९ वर्षीय तरुणाचा चाकू हल्ल्यात मृत्यू
    क्राईम

    फैजपूर तालुक्यात खळबळ; १९ वर्षीय तरुणाचा चाकू हल्ल्यात मृत्यू

    editor deskBy editor deskMarch 1, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    फैजपूर : प्रतिनिधी

    तालुक्यातील हिंगोणा या गावात मागील भांडणाच्या कारणावरून वाद झाला आणि या वादातून एका अल्पवयींसह सात जणांनी चौघांवर लाठ्‌या काठ्या व चाकुने हल्ला चढवला. यात प्रथमेश महाले या १९ वर्षीय तरुणाचा मृत्यु झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहे. ही घटना शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. तर या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात एका अल्पवयींसह सात जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी मध्ये मुंबई पोलीस दलात सेवेत असलेल्या एका पोलीस शिपायाचा देखील समावेश आहे या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, हिंगोणा ता. यावल या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र समोरील रहिवाशी योन कुटुंबात शनीवारी सकाळी मागील वादावरून भांडण झाले. यात प्रथमेश मुकेश महाले (वय १९), मोहित राजेंद्र गजरे (वय ३०), रीना रोहित गजरे (वय १९) व निखिल राजेंद्र गजरे (वय २६) या चौघांवर एक अल्पवयीन तसेच सुधीर रमेश तायडे, मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून नोकरीस असलेला मनोज सुधीर तावडे, सचिन सुधीर तावडे, आरती सचिन तायडे, मंगलाबाई सुधीर तायडे सर्व रा. हिंगोणा ता. यावल व निखिल संजय तायडे रा. मारूळ ता. यावल यांनी एकत्र येऊन लाठ्या काठ्‌याने व चाकुने हल्ला चढवला यात एका अल्पवयीन तसेच मुंबई पोलीस दलात असलेल्या मनोज तायडे यांनी चौघांवर चाकूने वार केले.

    यात प्रथमेश महाले हा तरुण ठार झाला. या घटनेनंतर या सर्वांना तातडीने सावदा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी त्याच्यावर उपचार करण्यात आले. तर मयत प्रथमेश याचा मृतदेह यावल ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला येथे वैद्यकिय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे यांनी शवविच्छेदन केले. तर याप्रकरणो फैजपूर पोलीस ठाण्यात रीना मोहित गजरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एक अल्पवयीन सह सात जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास डीवायएसपी अनिल बडगुजर, सहायक पोलिस निरिक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक मयोनोधीन सैय्यद करीत आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    क्षणिक राग अनावर; किरकोळ भांडणातून ४७ वर्षीयाचा मृत्यू ; आरोपी ताब्यात !

    March 1, 2026

    खळबळजनक : प्रेम प्रकरणातून गोळीबार : प्रेयसीची हत्या करत प्रियकराने संपविले आयुष्य !

    February 28, 2026

    जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थी न्याय क्रांती मोर्चा: विविध शैक्षणिक समस्यांविरोधात अभाविप आक्रमक

    February 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.