Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » काशी एक्स्प्रेसमध्ये धक्कादायक प्रकार; ३८ वर्षीय महिला हरवली
    क्राईम

    काशी एक्स्प्रेसमध्ये धक्कादायक प्रकार; ३८ वर्षीय महिला हरवली

    editor deskBy editor deskFebruary 27, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी

    कुर्ला टर्मिनस ते गोरखपूर दरम्यान धावणाऱ्या काशी एक्सप्रेसमधून प्रवास करताना एक महिला चाळीसगाव रेल्वे स्थानक परिसरातून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील मूळ रहिवासी व हल्ली वसई पूर्व येथे राहणारे अजय कुमार (वय ३९) हे आपल्या कुटुंबीयांसह २१ फेब्रुवारीला सकाळी कुर्ला टर्मिनस येथून गोरखपूरकडे काशी एक्स्प्रेसने प्रवास करत होते. ही गाडी दुपारी १२.४४ वाजेच्या सुमारास चाळीसगाव रेल्वे स्थानकावर थांबली. तर गाडी सुटल्यानंतर काही वेळात अजय कुमार यांच्या पत्नी किरण रावत (वय ३८) या दिसल्या नाहीत. तर, चाळीसगाव ते भुसावळ दरम्यान गाडीत  शोध घेतला असता त्या आढळल्या नाहीत.

    त्यामुळे त्या चाळीसगाव स्थानक परिसरातून हरवल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. किरण रावत यांचा रंग सावळा, उंची अंदाजे ५ फूट, बांधा सडपातळ, केस सोनेरी रंगाचे, अंगात नेव्ही ब्ल्यू रंगाचा पंजाबी ड्रेस होता. डाव्या हाताच्या मनगटावर ‘एके’ असे गोंदलेले आहे. त्यांना हिंदी बोलता येत असून या महिलेबाबत माहिती असल्यास जवळच्या पोलिस ठाण्यात कळवावे, असे आवाहन लोहमार्ग पोलिसांनी केले आहे. या प्रकरणी चाळीसगाव येथील लोहमार्ग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कार्यक्रमावरून परतताना अपघात; खा.संजय देशमुखांच्या वाहनाचा अपघात !

    February 27, 2026

    भरदुपारी ३५ वर्षीय महिलेने संपविले आयुष्य !

    February 27, 2026

    महिलेसोबत अश्लिल चाळे करीत विनयभंग ; एका विरोधात गुन्हा दाखल !

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.