Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अजित पवार अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवार ठाण्यात ठिय्या
    क्राईम

    अजित पवार अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवार ठाण्यात ठिय्या

    editor deskBy editor deskFebruary 26, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बारामती  :  वृत्तसंस्था

    राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आमदार रोहित पवार आज बारामती तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यांच्या सोबत त्यांचे वडील राजेंद्र पवार तसेच युगेंद्र पवारही उपस्थित होते.

    या वेळी पोलिस ठाण्याबाहेर बारामतीकरांनी मोठी गर्दी केली असून परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. “एकच वादा अजितदादा”, “अमर रहे अमर रहे अजितदादा अमर रहे”, “परत या परत या अजितदादा परत या” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. समर्थकांनी अजित पवारांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करत आक्रमक भूमिका घेतली.

    रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, हा लढा केवळ पवार कुटुंबाचा नसून सामान्य लोकांचा आहे. “दादांना न्याय मिळाला पाहिजे. सत्य बाहेर आलेच पाहिजे. सर्व संबंधित यंत्रणांविरोधात गुन्हा दाखल व्हावा,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

    दरम्यान, यापूर्वी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यातही आमदार रोहित पवार आणि आमदार अमोल मिटकरी यांनी एफआयआर नोंदवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याने त्याठिकाणीही वादाची परिस्थिती निर्माण झाली होती.

    आज बारामतीत पुन्हा एकदा एफआयआरसाठी प्रयत्न करण्यात येत असून, पोलिस प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अपघाताच्या तपासाबाबत वाढत्या शंकांमुळे आणि समर्थकांच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रकरण अधिकच चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बारामतीतील या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली असून, पुढील काही तासांत पोलिसांची भूमिका आणि प्रशासनाचा निर्णय निर्णायक ठरणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    शिवरायांचा अवमान खपवून घेणार नाही”; देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेत इशारा

    February 26, 2026

    तरुण मामीचा सख्ख्या भाच्याने केला विनयभंग ; गुन्हा दाखल !

    February 26, 2026

    सुप्रीम कोर्टाचा निर्णय: वाल्मिक कराडला नाही जामीन

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.