Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सुप्रीम कोर्टाचा निर्णय: वाल्मिक कराडला नाही जामीन
    राजकारण

    सुप्रीम कोर्टाचा निर्णय: वाल्मिक कराडला नाही जामीन

    editor deskBy editor deskFebruary 26, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बीड : वृत्तसंस्था

    बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराड याला मोठा धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळत सुनावणीस नकार दिला. न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश यांच्या समोर आज ही सुनावणी पार पडली. याआधी 19 फेब्रुवारीला प्राथमिक सुनावणी झाली होती, मात्र आजच्या निर्णयामुळे कराडला तातडीचा दिलासा मिळालेला नाही. जर खटल्याची सुनावणी वेगाने पार पडली नाही, तर वर्षभरानंतरच सर्वोच्च न्यायालयात पुन्हा जामिन अर्ज करण्याची संधी मिळेल.

    याआधी औरंगाबाद खंडपीठ आणि बीड जिल्हा न्यायालयानेही वाल्मिक कराडच्या जामीन अर्जांना नकार दिला होता. आजच्या सुनावणीपूर्वी संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी कॅव्हेट दाखल करून आपली बाजू न्यायालयासमोर मांडली. “दीड वर्षांपासून आमचे कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे,” असे धनंजय देशमुख यांनी सांगितले.

    फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्या बाबतीतही नवीन माहिती समोर आली आहे. धनंजय देशमुखांच्या मते, तो आतापर्यंत तीन वेळा आपल्या गावी आला आणि ही माहिती त्यांनी सीआयडीला दिली आहे. कृष्णा आंधळे मोबाईल वापरत नसल्यामुळे त्याचा माग काढणे कठीण जात आहे. कुटुंबाला त्याच्याकडून धोका असल्याची भीती असल्याने तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.

    संतोष देशमुख यांचे अपहरण 9 डिसेंबर 2024 रोजी झाले आणि नंतर त्यांची हत्या झाली. 10 डिसेंबर रोजी जयराम चाटे आणि महेश केदार यांना अटक; 12 डिसेंबरला घुले पुण्यातील रांजणगाव येथून ताब्यात;  18 डिसेंबरला विष्णू चाटे याला बीडमधून अटक; 4 जानेवारी रोजी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे पुण्यातून अटक; सिद्धार्थ सोनवणे कल्याण येथून पकडला; मात्र, कृष्णा आंधळे अद्याप फरार.

    अभियोगपत्रानुसार वाल्मिक कराड हा हत्येचा सूत्रधार असून आवादा कंपनीकडून खंडणी मागितल्याच्या वादातून संतोष देशमुख यांची हत्या झाली. खंडणी, ॲट्रॉसिटी आणि हत्या या तिन्ही गुन्ह्यांचा आरोपपत्रात समावेश आहे, ज्यामुळे प्रकरणाची गंभीरता वाढली आहे. सर्व आरोपींवर कठोर कारवाई व्हावी आणि न्यायालयीन प्रक्रिया वेगाने पार पडावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. या प्रकरणाकडे बीडसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    शिवरायांचा अवमान खपवून घेणार नाही”; देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेत इशारा

    February 26, 2026

    अजित पवार अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवार ठाण्यात ठिय्या

    February 26, 2026

    तरुण मामीचा सख्ख्या भाच्याने केला विनयभंग ; गुन्हा दाखल !

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.