शपथविधी कुठे आणि कसा होणार, मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री ठरवणार !
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून दोन आठवडे उलटूनही मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्यानं विरोधक टीका करू लागले आहेत. शिंदे आणि फडणवीस सरकारचा मंत्रिंडळाचा विस्ताराकडे लक्ष लागले आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी वेगानं हालचाली सुरू झाल्या असून मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरल्याची माहिती समोर आली आहे.
शिंदे आणि फडणवीस सरकार येऊन 15 दिवस झाले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. शिंदे सरकारचा शपथविधी दोन टप्प्यात होणार आहे. येत्या 20 किंवा 21 जुलै रोजी मुंबईत मंत्रिमंडळात शपथ होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्यात एकूण 12 मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. पण, काही मंत्र्यांना थाटामाटात शपथ घ्यायचा आहे. राज्यात पूरपरिस्थिती असल्यामुळे साध्याच पद्धतीने शपथविधी घ्यावा, अशी चर्चाही भावी मंत्र्यांमध्ये रंगली आहे.पहिल्या टप्प्यात नेमकं कोण-कोणत्या आमदारांना संधी मिळते हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे.
शपथविधी सोहळ्यावरून आमदार मंत्र्यांमध्ये मत प्रवाह झाले. काही मंत्र्यांनी राज्यातील पूरपरिस्थितीमुळे साधेपणानं राजभवनातील दरबार हॅालमध्ये शपथविधी करण्याची मागणी केली तर, दुसरीकडे काही भावी मंत्र्यांनी विधान भवनातील प्रांगणात मोठ्या दिमाखात शपथविधी करण्याची मागणी केली आहे. शिंदे आणि फडणवीस यांच्याकडे या निर्णय मांडण्यात आलाहआहेत. राज्यात पूरपरिस्थिती असल्यामुळे शपथविधी सोहळा करणे योग्य आहे का? असा प्रश्नंही विचारला जाणार आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या 40 आणि अपक्ष अशा जवळपास 50 पेक्षा जास्त आमदारांनी बंड केलं. एकनाथ शिंदे यांच्यासोबत मागच्या सरकारमधले 8 मंत्रीही सहभागी होते, त्यामुळे त्यांनाही नव्या मंत्रीमंडळात आपल्याला स्थान असेल अशी अपेक्षा आहे. मंत्रिमंडळात भाजपला 29 कॅबिनेट मंत्रीही हवी आहे. तर शिंदे गटाला 8 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्री अशी एकूण 13 मंत्रिपद हवी आहेत. 6 आमदारांमागे एक मंत्रिपद अशी अट शिंदे गटाकडून घालण्यात आली असून एकूण 19 मंत्रिपद हवी अशी मागणी आहे.