Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भरदिवसा थरार : डोळ्यात मिरची टाकत साडे पाच लाखांची रोकड लंपास !
    क्राईम

    भरदिवसा थरार : डोळ्यात मिरची टाकत साडे पाच लाखांची रोकड लंपास !

    editor deskBy editor deskFebruary 26, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी

    शहरातील पिंपळे रस्त्यावर भरदिवसा धाडसी चोरीची घटना घडली असून, व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकत साडेपाच लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. ही घटना बुधवार (दि. २५) रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, बाजार समितीचे व्यापारी यतीन कोठारी हे आपल्या स्कुटीवरून पिंपळे रस्त्यावरील लामा जीनकडे जात होते. त्यावेळी तोंडाला मास्क लावलेले तीन संशयित मोटरसायकलस्वार त्यांच्या जवळ आले. संशयितांनी प्रथम कोठारी यांचा चष्मा काढून फेकला आणि तत्काळ त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे कोठारी गोंधळून गेले. याच वेळी त्यांच्या जवळील साडेपाच लाख रुपयांची रोकड असलेली पिशवी खाली पडली. संधी साधत चोरट्यांनी ती पिशवी उचलली आणि मोटरसायकलवरून पसार झाले.

    घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसराची पाहणी करून आरोपींच्या शोधासाठी विशेष पथक रवाना केले आहे. पिंपळे रस्त्याला दोन्ही बाजूंनी रिंगरोड तसेच सरळ मार्ग असल्याने आरोपी नेमक्या कोणत्या दिशेने पसार झाले, याचा तपास सुरू आहे.

    विशेष म्हणजे, घटना घडलेल्या परिसरात एकही सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने तपासात अडचणी निर्माण होत आहेत. व्यापारी मोठी रक्कम घेऊन येत असल्याची माहिती चोरट्यांना पूर्वीपासून असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, रेकी करून ही चोरी करण्यात आल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय काकळीज करत आहेत. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बँकेतून काढले १० लाख; पंक्चरदरम्यान ८ लाखांवर चोरट्यांचा डाव !

    February 26, 2026

    ट्रॅक्टरच्या चाकाखाली दबून २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

    February 26, 2026

    खानापूरजवळील लुटीचा उलगडा; ६७ सीसीटीव्ही तपासून पोलिसांची धडाकेबाज कारवाई

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.