जळगाव ;- विवेकानंद प्रतिष्ठान संचलित प्राथमिक शाळा वाघ नगर येथे प्राथमिक व माध्यमिक विभागात दिनांक २१/०८/२०२१ वार शनिवार रोजी रक्षाबंधन निमित्त ऑनलाइन झूम ॲप च्या माध्यमातून इयत्ता १ ली ते इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यानी बनवलेल्या राख्यांचे ” राखी प्रदर्शनी” चे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक श्री. हेमराज पाटील सर यांना राखी बांधून करण्यात आली. तसेच प्रदर्शनी चे उद्घाटन मा. मुख्याध्यापक सरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उपलब्ध असलेल्या साहित्यापासून सुरेख राख्या बनवल्या.
राखी’ ह्या शब्दातच “रक्षण कर’ “राख म्हणजे सांभाळ’ हा संकेत आहे. रक्षण करणे हा धर्म आहे. या वाक्यांप्रमाने वृक्ष आपले संरक्षण करत आले आहेत आपण अस्तित्वात आहोत ते त्यांनी दिलेल्या प्राणवायू मुळे या गोष्टीची शिकवण घेत विद्यार्थ्यांनी एक रोप लावून त्याला राखी बांधून त्याचे रक्षण करण्याची जबादारी घेतली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक साधन वैराळे यांनी केले. विद्यार्थ्यांना रक्षाबंधन ची माहिती व महत्व श्री. श्रीराम लोखंडे सर यांनी सांगितले.
प्रदर्शनी साठी लागणारी व्यवस्था सौ. राजश्री पाटील, सौ. भाग्यश्री वारूडकर यांनी केली. कार्यक्रम पत्रिका व छायाचित्र याची जबाबदारी श्री. सुयोग गुरव यांनी सांभाळली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मीना मोहकर यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन श्री. जानकीराम पाटील, सौ. मीना मोहकर साधना वैराळे यांनी केले. कार्यक्रमाला मुख्याध्यापक श्री. हेमराज पाटील , समन्वयीका सौ. जयश्री वंडोळे, सौ. वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.