लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शिवसेनेतील मोठ्या फुटीनंतर राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं आहे. शिंदे फडणवीस हे सरकार आल्यानंतर आता शिंदे गटाच्या बंडाच्या काळातील नवीन कहाणी समोर आली. शिंदे गटाच्या बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता. उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्या शपथविधीआधी देवेंद्र फडणवीस यांना फोनवरून ऑफर दिली.
ठाकरे सरकारच्या गौप्यस्फोट करण्यात आला आहे. एकनाथ शिंदेसह 26 आमदार सुरतला गेले नंतर उद्धव ठाकरे यांनी हालचाली सुरू केल्या फडणवीस यांना संपर्क साधून डील करण्याचाही प्रयत्न केला होता.उद्धव ठाकरे यांनी फडवीसांना फोन केला होता आणि तुम्ही मुख्यमंत्री व्हा, शिंदे यांना बाजूला ठेवा, मी सगळी शिवसेना घेऊन तुमच्याकडे येतो असं उद्धव ठाकरे फडणवीसांना म्हणाले होते अशी माहिती ‘साम’ने दिली आहे. एवढेच नव्हे तर उद्धव ठाकरे यांनी खुर्ची वाचवण्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशीही संपर्क साधला होता. मात्र, या दोन्ही नेत्यांनी प्रतिसाद न दिल्याने ठाकरे यांना सत्ता सोडावी लागली आहे.
शिंदे गटाचा बंड मोडून काढण्यासाठी ठाकरे यांनी नवीन शक्कल लढवली त्यांनी आधी आपल्यासोबत असलेल्या विधेयकांशी मन वळवून त्यांना आपल्याकडेच ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. वेळीच सुरतमधील बंडखोर आमदारांना गुवाहाटीला पाठवण्यात आलं. त्यानंतर ठाकरे यांच्या सोबतचे आमदारही गुवाहाटीला पोहोचले. त्यामुळे उद्धव ठाकरे हादरून गेले, पाया खालची जमीन सरकली.