जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावात दि. ४ रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घरात झोपलेल्या महिलेच्या अंगावर हात फिरवून तिचा विनयभंग केला. महिलेने आरडाओरड केल्यामुळे तीचा मुलाला जाग आल्यानंतर त्याला देखील संशयिताने जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी संशयीत राजमल सपकाळे याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील एका गावात ४८ वर्षीय महिला वास्तव्यास आहे. दि. ४ रोजी तीने मुलासोबत जेवण केले आणि त्यांनी घराचा दरवाजा अर्धवट उघडा ठेवून झोपून गेले. यावेळी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास संशयित राजमल सपकाळे हा महिलेला झोपलेल्या खाटेवर बसून तिच्या अंगावर हात फिरवीत असल्याचे तीला जाणवले. महिलेला जाग आल्यानंतर तीने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. यावेळी तीचा मुलगा झोपून जागा होत तो आई झोपलेल्या ठिकाणी आला. यावेळी संशयित राजमल सपकाळे याने महिलेसह तिच्या मुलाला शिवीगाळ करीत जीवेठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान, दि. २१ रोजी महिलेने तालुका पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार संशयित राजमल सपकाळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ दिनेश चव्हाण हे करीत आहे.



