Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !
    क्राईम

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    editor deskBy editor deskFebruary 22, 2026Updated:February 22, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी

    चाळीसगाव शहरातील न्यायालय परिसरात भरदुपारी एका वकिलावर सुरी व कोयत्याने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना २० फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे २.४५ वाजता घडली. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाणे येथे तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरात खळबळ उडाली आहे.

    जखमी वकील अॅड. समीर अफजल शेख (वय ४५, रा. नारायण वाडी, चाळीसगाव) यांनी दिलेल्या जबाबावरून गुन्हा नोंदविण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, अॅड. शेख हे नेहमीप्रमाणे न्यायालयीन कामकाजात व्यस्त असताना संशयित नाज उर्फ माज आरीफ खाटीक याने त्यांना फोन करून चौकशी केली. आपण न्यायालयात असल्याचे सांगितल्यानंतर काही वेळातच आरिफ रहेमतुल्ला खाटीक, दानीश आरीफ खाटीक व नाज उर्फ माज आरीफ खाटीक (सर्व रा. हिरापूर रोड, चाळीसगाव) हे लोखंडी सुरी व कोयता घेऊन न्यायालय परिसरात दाखल झाले.

    प्राथमिक माहितीनुसार, आरिफ खाटीक याने ‘आज याला संपवून टाका’ असे उद्गार काढताच दानीश खाटीकने सुरीने अॅड. शेख यांच्या पोटावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेख यांनी प्रसंगावधान राखत मागे हटल्याने ते थोडक्यात बचावले. त्याचवेळी नाज उर्फ माज खाटीक याने कोयत्याने डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. शेख यांनी डावा हात डोक्यावर धरल्याने कोयता हातावर बसला व त्यांच्या बोटांना गंभीर इजा झाली.  जखमी अवस्थेत अॅड. शेख यांना तातडीने बापजी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

    दरम्यान, प्लॉट खरेदी-विक्रीच्या वादातून हा हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. न्यायालय परिसरात घडलेल्या या धाडसी हल्ल्यामुळे वकील व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी संबंधित तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर मुटेकर करीत आहेत. आरोपींचा शोध सुरू असून न्यायालय परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    अमळनेरातील डॉक्टराची एक कोटीत फसवणूक !

    February 22, 2026

    वडिलांच्या निधनानंतरही चाळीसगावातील नेहाचा धैर्याचा पेपर; डोळ्यांत अश्रू, हातात पेन !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.