Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अमळनेरातील डॉक्टराची एक कोटीत फसवणूक !
    अमळनेर

    अमळनेरातील डॉक्टराची एक कोटीत फसवणूक !

    editor deskBy editor deskFebruary 22, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी

    क्रिप्टो करंसी ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करून नफ्याचे अमिष दाखवत डॉ. अनिल नथ्थू शिंदे (वय ७०, रा. अमळनेर) यांची १ कोटी ६५ लाख ५७ हजारात ऑनलाईन फसवणूक झाली. फेसबुकवर आलेली ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ स्वीकारल्यानंतर हा सर्व प्रकार घडल्याचे उघड झाले आहे. ही घटना दि. २९ जानेवारी ते दि. १९ फेब्रुवारीदरम्यान घडली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात झासी प्रवीण पाटील नामक महिलेसह तिच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर येथे एका वैद्यकीय फाउंडेशनमध्ये डॉक्टर असलेले अनिल शिंदे यांना दि. २९ जानेवारी रोजी झासी पाटील नामक महिलेची फेसबुकवर ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ आली. त्यांनी रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर दोघांमध्ये साधारण बोलणे सुरू झाले. या दरम्यान महिलेने एका इंटरनॅशनल ट्रेडिंगबद्दल माहिती दिली. त्यानंतर दि. ९ फेब्रुवारी रोजी महिलेने डॉक्टरांशी संपर्क साधून क्रिप्टो करंसी ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवणूकविषयी माहिती देत मोठा नफा मिळेल, असे अमिष दाखविले. तसेच गुंतवणुकीसाठी लिंक पाठविली व त्याद्वारे अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. डॉ. अनिल शिंदे यांनी सुरुवातीला ऑनलाईन ७० हजार रुपये पाठवून गुंतवणूक केली. त्यावर त्यांना १ लाख ५३ हजार २१ रुपये नफा झाल्याचे दाखविण्यात आले.

    आता पैसे नसल्याचे डॉक्टरांनी सांगत भरलेले पैसे परत मिळण्याची विनंती केली. मात्र उडवाउडवीचे उत्तरे देत पैसे देण्यास नकार देण्यात आला. याप्रकरणी डॉ. अनिल शिंदे यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून झासी पाटील व तिच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सतीश गोराडे करीत आहेत.

    विश्वास संपादन केल्यानंतर ऑनलाईन ठगांनी डॉ. शिंदे यांच्याकडून वेळोवेळी एकूण १ कोटी ६५ लाख ५७ हजार २०४ रुपये स्वीकारले. डॉक्टरांनी केलेल्या एकूण १ कोटी ६५ लाख ५७ हजार २०४ रुपयांच्या गुंतवणुकीतून ३ कोटी ९१ लाख ८७हजार ७६६ रुपये नफा झाल्याचे त्यांना दिसत होते. ती रक्कम काढण्याविषयी त्यांनी सांगितले असता त्यासाठी कंपनीची २० टक्के व्हेरिफिकेशन फी म्हणून ६५ लाख ३१ हजार २९४ रुपये भरावे लागतील, असे सांगण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026

    वडिलांच्या निधनानंतरही चाळीसगावातील नेहाचा धैर्याचा पेपर; डोळ्यांत अश्रू, हातात पेन !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.