धरणगाव प्रतिनिधी । माजी पालकमंत्री आ. गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांनी शिवसेना पदाचा राजीनामा देण्याची सुरुवात झाली आहे.
राजीनामे देऊन समर्थकांनी शिंदे गटाला जाहीर पाठिंबा दिला आहे
आम्ही माजी मंत्री आ. गुलाबरावजी पाटील यांचा खंदे समर्थक असून गुलाबभाऊंनी आमच्या गावासाठी मागितली ती विकासकामे व मदत केलेली आहे. आमच्या सर्व सुखदुःखात माजी मंत्री आ. गुलाबरावजी पाटील, त्यांचे चिरंजीव जिप सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील हे सदैव हजर असतात. त्यामुळे आम्ही राजीनामा देत आहे सर्वांनी सांगितले