Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शिंदे गटाचा खुला इशारा: “माझ्या नादी लागू नका, ठाणे-कल्याण लोकसभेत उभा राहा”
    राजकारण

    शिंदे गटाचा खुला इशारा: “माझ्या नादी लागू नका, ठाणे-कल्याण लोकसभेत उभा राहा”

    editor deskBy editor deskFebruary 16, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भाजप नेते व मंत्री गणेश नाईक यांच्यावर जोरदार टीका केली आहे आणि खुल्या आव्हानाद्वारे ठाणे किंवा कल्याण लोकसभेतून निवडणूक लढवण्यास सांगितले आहे. “तुम्ही शिंदे साहेबांच्या नादी लागा, पण माझ्या नादी लागू नका,” असे श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.

    दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गणेश नाईक यांच्यातील वाद सर्वश्रुत आहेत. गणेश नाईक यांनी श्रीकांत शिंदे यांना वयावरून टोला दिला होता. त्यावर पलटवार करत श्रीकांत शिंदे म्हणाले, “वयाच्या हिशोबाने आजार होत असतात; विसरभोळेपणा, चिडचिड, दिशाभूल यासारखे आजार होतात. हे मी सांगू शकतो कारण मी डॉक्टर आहे.”

    श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले की, माजी खासदार करण्याचे वक्तव्य नाईकांनी करू नये; “जर जास्तच खुमखुमी असेल तर ठाणे किंवा कल्याण लोकसभेतून तुम्ही किंवा तुमच्या मुलाने निवडणूक लढवून दाखवा. मी तुमच्यासमोर उभा राहील.” श्रीकांत शिंदे यांना तीन वेळा लोकांनी निवडून दिले आहे, असेही त्यांनी नमूद केले.

    दरम्यान, महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिरात शिवलिंगाला मनोभावे दुग्धाभिषेक केला. तेथे त्यांनी शिवमंदिर कॉरिडॉर विकासकामांचा उल्लेख करत, येणाऱ्या काळात हा कॉरिडॉर देशभरातील भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरेल आणि पर्यटनाला चालना मिळेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला. या वादामुळे पुन्हा एकदा शिंदे गट व भाजप यांच्यातील राजकीय तणाव वाढण्याची शक्यता आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बुरखा घालून ज्वेलरी दुकानात दरोडा; ‘खेळण्याच्या पिस्तुलाने’ 3.6 लाखांचे सोनं लंपास : प्रेमीयुगुल अटकेत

    April 3, 2026

    नाशिक भोंदूबाबा प्रकरणाला नवे वळण : पत्नी कल्पना खरात फरार, SITच्या तपासात धक्कादायक खुलासे

    April 3, 2026

    क्लबमध्ये गोळीबार आणि तलवारीसह हल्ला, चार ते पाच जखमी!

    April 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.