Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दिल्लीच्या तरुणाच्या नावावर जळगावात फसवणूक : डॉक्टर व लॅब व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा !
    क्राईम

    दिल्लीच्या तरुणाच्या नावावर जळगावात फसवणूक : डॉक्टर व लॅब व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा !

    editor deskBy editor deskFebruary 15, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    रुग्णालयात दाखल असल्याची बनावट नोंद करून पॅथॉलॉजी लॅबमधून खोटे वैद्यकीय अहवाल तयार करत दिल्लीतील तरुणाच्या नावे वैद्यकीय विम्याची रक्कम परस्पर हडपल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जळगावातील अजिंठा चौफुली परिसरातील टायटन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. इम्रान बी. नाईकवाडी तसेच जोगेश्वरी पॅथॉलॉजी लॅबच्या व्यवस्थापकाविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, नवी दिल्ली येथील तुघलकाबाद परिसरातील रहिवासी विजय संतराम गुप्ता (२५) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, २१ सप्टेंबर २०२४ रोजी त्यांना जळगावातील टायटन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याचे दाखविण्यात आले. तसेच जोगेश्वरी पॅथॉलॉजी लॅबमधून त्यांच्या नावाचे वैद्यकीय तपासणी अहवाल तयार करून त्याच्या आधारे विमा कंपनीकडून वैद्यकीय खर्चाची रक्कम मंजूर करून घेण्यात आली व ती रक्कम परस्पर हडपण्यात आली.

    दरम्यान, विजय गुप्ता हे वैद्यकीय विम्याचे नूतनीकरण करण्यासाठी विमा कंपनीकडे गेले असता, ‘नो क्लेम बोनस’ची सूट मिळणार नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यांनी याबाबत अधिक चौकशी केली असता, त्यांनी यापूर्वीच वैद्यकीय विम्याचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली. सखोल तपास केल्यावर जळगावातील संबंधित रुग्णालयातून त्यांच्या नावावर उपचार दाखवून विमा रक्कम काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

    फसवणूक लक्षात आल्यानंतर त्यांनी दिल्ली येथे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर हा गुन्हा जळगाव एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. पोलिसांनी प्राथमिक तपासात माहिती घेतली असता संबंधित हॉस्पिटल मागील तीन ते चार महिन्यांपासून बंद असल्याचे आढळून आले आहे.

    तपासाधिकारी सध्या संबंधित डॉक्टरांचा शोध घेत असून, बनावट कागदपत्रे कशी तयार करण्यात आली, पॅथॉलॉजी लॅबमध्ये प्रत्यक्षात कोणाचे नमुने घेण्यात आले होते का, तसेच विमा कंपनीकडून नेमकी किती रक्कम उचलण्यात आली, याचा तपास सुरू आहे. या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रातील गैरप्रकार पुन्हा एकदा समोर आले असून परिसरात खळबळ उडाली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कोट्यवधींची रोकड न भरताच उपनिरीक्षक बेपत्ता; दक्षता पेट्रोलपंपातील आर्थिक गैरव्यवहाराचा संशय

    February 15, 2026

    गॅस कटरने कपाटाचे कुलूप तोडून दागिने लंपास !

    February 15, 2026

    ५० हजार नागरिकांच्या सुरक्षेसाठी कालिका माता परिसरात स्वतंत्र पोलिस ठाण्याची मागणी

    February 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.