लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शिंदे गटात बंडखोर सुरू झाल्यानंतर शिवसेनेत फूट पडली आणि अनेक आमदारांनी खासदार यांनी आपला राजीनामा शिवसेनेला दिला आहे. धरणगावात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील यांनी राजीनामा दिला आहे. शिवसेनेचा हा सर्वात मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. ठाकरे सरकारच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने शिवसेना संकटात अडकली आहे.
शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील यांनी देखील आता राजीनामा दिला आहे. नितीन प्रभाकर पाटील यांनी अगदी दोन ओळीत मजकूर लिहून राजीनामा दिला आहे.तर आणखी काही पदाधिकारी राजीनामा देण्याच्या मार्गावर आहे. राजेंद्र महाजन यांनी स्वखुशीने राजीनामा दिल्याचे म्हटले आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं आहे. मात्र, अजूनही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणी कमी झालेल्या दिसत नाही. नितीन प्रभाकर पाटील हे शिवसेनेचे एकनिष्ठ पदाधिकारी होते. तर शिंदे गटात सामील होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे अनेक नेते पदावरुन कमी होत असल्याने शिवसेना पेचात अडकली आहे.