Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » फसवणूक प्रकरणात फसले अभिनेता श्रेयस तळपदे; १२ जणांविरुद्ध पोलिस कारवाई!
    क्राईम

    फसवणूक प्रकरणात फसले अभिनेता श्रेयस तळपदे; १२ जणांविरुद्ध पोलिस कारवाई!

    editor deskBy editor deskFebruary 11, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता श्रेयस तळपदे याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून चित्रपटसृष्टीत मोठी खळबळ उडाली आहे. १० फेब्रुवारी रोजी मैनपुरीच्या भोगांव पोलीस ठाण्यात तळपदे आणि इतर ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    अधिकार्‍यांच्या माहितीनुसार, भोगांवच्या मिश्राणा मोहल्ल्यात राहणाऱ्या एका व्यक्तीने अभिनेता आणि त्याच्या साथीदारांवर गुंतवणुकीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. अभिनेत्याने आपल्या साथीदारांसह शहरातील मिश्राना परिसरातील मुंबई बँकेच्या शाखेत गुंतवणुकीच्या माध्यमातून गावकऱ्यांना फसवले असल्याचा तपशील पोलिसांकडे आला आहे. या १२ व्यक्तींमध्ये समीर अग्रवाल, सानिया अग्रवाल, आरके सेट्टी, फंड मॅनेजर संजय मुदगिल, शबाब हुसेन, श्रेयस तळपदे, नरेंद्र नेगी, पंकज अग्रवाल, सुप्रिया, अनुज जैन, अजय श्रीवास्तव आणि अरविंद त्रिपाठी यांचा समावेश आहे.

    गुन्ह्याचा तपास न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी ताबडतोब सुरू केला आहे. यापूर्वीही अभिनेता श्रेयस तळपदेचे नाव विविध आर्थिक गुन्ह्यांमध्ये चर्चेत आलेले आहे. २०२५ मध्ये त्याच्यावर चिटफंड प्रकरणातील तक्रारी दाखल झाल्या होत्या आणि उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि हरियाणा येथे त्याच्याविरुद्ध कारवाई सुरू होती.  या नवीन प्रकरणामुळे अभिनेत्याच्या अडचणीत अधिक भर पडली आहे, तसेच त्याच्या सामाजिक आणि व्यावसायिक प्रतिष्ठेला गंभीर धक्का बसण्याची शक्यता आहे. पोलिस आणि तपास यंत्रणा याप्रकरणी सखोल चौकशी करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बारामती विमान दुर्घटनेला घातपाताचा रंग? पिंकी माळींच्या वडिलांचा खळबळजनक दावा

    February 11, 2026

    चंद्रपूर महापालिकेत ठाकरे गटाचा भाजपला पाठिंबा

    February 11, 2026

    अजित पवार स्मारक व संग्रहालयाचा वाद; जय-पार्थ पवार यांची भूमिका भिन्न

    February 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.