जळगाव : प्रतिनिधी
पैसे न दिल्याचा राग आल्याने तरुण आईला शिवीगाळ करीत होता. त्याला समजवित असतांना त्याने हातातील लोखंडी पाईप भाऊ मयुर चंद्रकांत गुरव (वय २१, रा. पंढरपूरनगर) यांच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. ही घटना दि. २ रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास पंढरपूर नगरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पंढरपूर नगरात मयुर गुरख हा तरुण वास्तव्यास आहे. दि. २ रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास तो घरी आला आणि आईकडे पैसे मागू लागला. आईने त्याला माझ्याजवळ पैसे नाही असे सांगितले असता, त्याला राग आल्याने त्याने आईला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दरम्यान, त्याचे वडील त्याला समजवित असतांना शंतनू याने हातातील लोखंडी रॉड मयूर गुरव याच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. तसेच आईवडीलांना शिवीगाळ करीत चापटा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मयूर गुरव यांच्या तक्रारीवरुन संशयित शंतनू चंद्रकांत गुरव (रा. अयोध्यानगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



