Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ४५ वर्षीय प्रौढाने घरी कुणीही नसताना घेतला टोकाचा निर्णय !
    क्राईम

    ४५ वर्षीय प्रौढाने घरी कुणीही नसताना घेतला टोकाचा निर्णय !

    editor deskBy editor deskFebruary 11, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    पत्नी नातेवाईकांकडे लग्न सोहळ्यासाठी व मुले बाहेर गेलेले असताना सुकलाल नारायण गोपाळ (४५, रा. समतानगर) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ९ फेब्रुवारी रोजी समतानगरात घडली. मुलीचे १५ ते २० दिवसांवर लग्न आले असताना प्रौढाने जीवनयात्रा संपविल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, मजुरी काम करणारे सुकलाल गोपाळ यांना पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार. त्यांच्या मुलीचे लग्न ठरले असून त्याची घरात लगबग सुरू असताना ९ रोजी त्यांची पत्नी जवखेडा या मूळगावी नातेवाईकांकडे लग्नाला गेली होती. तर मुलगा व मुलगी बाहेर गेलेले होते. त्यावेळी गोपाळ यांनी घरात गळफास घेतला. मुलगा घरी आला त्यावेळी ही घटना लक्षात आली. प्रौढास शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रवीण जगदाळे करीत आहेत

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पैशांच्या कारणावरून भावाकडून भावावर जीवघेणा हल्ला

    February 11, 2026

    पैशांच्या वादातून भावावर लोखंडी पाईपने हल्ला

    February 11, 2026

    खा.नारायण राणे जसलोक रुग्णालयात दाखल; हृदयावरील उपचार सुरू

    February 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.