Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » खा.नारायण राणे जसलोक रुग्णालयात दाखल; हृदयावरील उपचार सुरू
    क्राईम

    खा.नारायण राणे जसलोक रुग्णालयात दाखल; हृदयावरील उपचार सुरू

    editor deskBy editor deskFebruary 10, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    भाजपाचे ज्येष्ठ नेते व खासदार नारायण राणे यांना मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हृदयाशी संबंधित उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

    अलिकडेच कोकण दौऱ्यावर असताना नारायण राणे यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत देणारे वक्तव्य केले होते. कणकवली येथे स्थानिक नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजपाला मिळालेल्या यशानंतर आयोजित सत्कार समारंभात बोलताना त्यांनी, “आता आपण थकलो आहोत. किती करणार यालाही मर्यादा असते,” असे विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या होत्या.

    याच भाषणात त्यांनी आपली दोन्ही मुले कर्तृत्ववान असून आपल्या-आपल्या क्षेत्रात यशस्वी असल्याचे सांगितले होते. “त्यांना नांदा सौख्यभरे,” असे म्हणत त्यांनी मुलांना जाहीर आशीर्वादही दिले होते. दरम्यान, नारायण राणे यांच्या रुग्णालयात दाखल होण्याची बातमी समजताच त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पक्षातील नेते आणि कार्यकर्ते त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी सदिच्छा व्यक्त करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवारांच्या विमान अपघातावर प्रश्नचिन्ह; रोहित पवारांची भावनिक पत्रकार परिषद

    February 10, 2026

    ‘सलमान खान उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त हिंदू’ : नितेश राणेंचा खोचक टोला

    February 10, 2026

    भावनिक पार्श्वभूमीत कॅबिनेट बैठक; अजित पवारांच्या प्रस्तावांवर शिक्कामोर्तब

    February 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.