जळगाव : प्रतिनिधी
रस्त्याने जात असतांना दुचाकीचा अपघात होवून रतन वसंत गायकवाड (वय ५१, रा. दापोरा, ता. जळगाव) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांचयवर उपचार सुरु असतांना दि. ७ रोजी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील दापोरा येथील रतन गायकवाड यांचा वावडदा जवळून जात असतांना दुचाकीचा अपघात झाल्याची घटना दि. २ रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली होती. त्यांना एका खासगी रुग्णालयता उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मेंदुला मार लागल्यामुळे त्यांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. परंतू अतिदक्षता विभागात उपचार सुरु असातंना दि. ७ रोजी सकाळी पावणेनऊ वाजेच्या सुमारास रतन गायकवाड यांचा दुर्देवी मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोहेकॉ गणेश वंजारी हे करीत आहे.



