जळगाव : प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेस (शरदचंद्र पवार) संघटनेत जळगाव ग्रामीण जिल्ह्याच्या नेतृत्वात महत्त्वाचा बदल करण्यात आला असून, जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्षा पदावर नव्या नेतृत्त्वाची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे अधिकृत नियुक्तीपत्र नुकतेच जाहीर करण्यात आले.
या नियुक्तीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा. शरदचंद्रजी पवार साहेब, राष्ट्रीय कार्याध्यक्षा व महासंसदरत्न खा.मा. सुप्रियाताई सुळे, महिलांच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती फौजीयाताई खान, माजी मंत्री मा.आ. जयंतराव पाटील साहेब तसेच प्रदेशाध्यक्ष मा.आ. शशिकांत शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली संघटना अधिक मजबूत करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवणे, महिला संघटना अधिक सक्रिय करणे, तसेच पक्षबांधणीसाठी प्रभावी काम करणे, अशी अपेक्षा नियुक्तीपत्रात व्यक्त करण्यात आली आहे. जळगाव ग्रामीण भागात राष्ट्रवादी महिला काँग्रेस अधिक बळकट करण्यासाठी ही नियुक्ती महत्त्वाची ठरणार असल्याचे पक्षातील वरिष्ठांनी स्पष्ट केले आहे.
या नियुक्तीबद्दल अॅड. रोहिणी एकनाथराव खडसे यांनी अभिनंदन करत, भविष्यात पक्षवाढीसाठी व संघटनात्मक कामासाठी पूर्ण सहकार्य मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. या नियुक्तीमुळे जळगाव ग्रामीण जिल्ह्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्याला नवी दिशा मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.



