Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भीषण अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा दुर्देवी मृत्यू !
    क्राईम

    भीषण अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

    editor deskBy editor deskFebruary 8, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    यावल-रावेर रस्त्यावरील बालाजी इंडस्ट्रीजजवळ झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या २५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अकिलेश उर्फ गोलू अविनाश कोळी (रा. महाराणा प्रताप नगर, यावल) असे मृत तरुणाचे नाव असून, शनिवारी ७ फेब्रुवारी पहाटे जळगाव येथील खाजगी रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला.

    मिळालेल्या माहितीनुसार, दि. १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास अकिलेश हा आपल्या ताब्यातील पल्सर मोटरसायकलने (एमएच १९ डिक्यू ३७०६) रावेरकडून यावलकडे येत होता. यावल शिवारातील बालाजी इंडस्ट्रीजजवळील वळणावर एका अज्ञात वाहन चालकाने आपले वाहन हयगयीने आणि भरधाव वेगाने चालवून अकिलेशच्या दुचाकीला कट मारला. या धडकेमुळे अकिलेश दुचाकीवरून फेकला गेल्याने त्याच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली होती. याप्रकरणी रामदास भगवान कोळी (वय ३७) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    घटनेनंतर अकिलेशवर जळगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र शनिवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. मृत अकिलेशच्या पश्चात केवळ त्याची आई असून, तरुण मुलाच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वसीम तडवी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. अद्याप अज्ञात वाहन चालकाचा शोध लागलेला नसून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.