Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी; सोनं-चांदी झाली स्वस्त
    lifestyle

    ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी; सोनं-चांदी झाली स्वस्त

    editor deskBy editor deskFebruary 8, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील सुवर्ण बाजारात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दरवाढीच्या मालिकेला अखेर ब्रेक लागला असून, सोने व चांदीचे दर विक्रमी पातळीच्या खाली आले आहेत. गेल्या पंधरा दिवसांच्या तुलनेत सोन्याचे दर तब्बल २३ हजार रुपये, तर चांदीचे दर १ लाख ३८ हजार रुपयांनी घसरले आहेत. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला असला, तरी चढ्या भावात गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

    आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनिश्चिततेत काही प्रमाणात घट झाल्याचे संकेत मिळत असल्याने सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहण्याचा कल कमी झाला आहे. त्यामुळे सोने व चांदीच्या दरांमध्ये होत असलेली दिवसागणिक वाढ थांबली आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या मौल्यवान धातूंनी उच्चांक गाठला होता. मात्र, सध्या जागतिक बाजारपेठेत स्थिरता येऊ लागल्याने सोन्याची मागणी घटली असून, त्याचा थेट परिणाम दरांवर दिसून येत आहे.

    पंधरा दिवसांपूर्वी जळगाव शहरातील सुवर्ण बाजारात २४ कॅरेट सोन्याचा दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १ लाख ८२ हजार ८२५ रुपये इतक्या उच्चांकावर पोहोचला होता. मात्र, शनिवारी (दि. ७) सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १ लाख ५९ हजार ५४७ रुपयांवर स्थिरावले. त्यामुळे या कालावधीत सोन्याच्या दरात २३ हजार २७८ रुपयांची घसरण झाली आहे.

    चांदीच्या किमतींमध्येही मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. गेल्या आठवड्यापर्यंत चांदीचा दर जीएसटीसह प्रति किलो ४ लाख ६ हजार ८५० रुपये इतक्या उच्चांकावर होता. मात्र, शनिवारी (दि. ७) सकाळी बाजार उघडताच चांदीचा दर जीएसटीसह प्रति किलो २ लाख ६८ हजार ८३० रुपये इतका नोंदविण्यात आला. त्यामुळे अवघ्या पंधरा दिवसांत चांदी तब्बल १ लाख ३८ हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.