धरणगाव प्रतिनिधी । येथील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. टी एस बिराजदार हे ३७ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले आहेत. यानिमित्ताने महाविद्यालयाच्या प्रांगणात सेवापूर्ती गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. दरम्यान प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करून सन्मानित करण्यात आले.
२००३ मध्ये महाविद्यालयात राज्यशास्त्र (पॉलिटिक्स) ह्या विषयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले, ते राज्यशास्त्र विषयात पारंगत होते. धरणगाव सारख्या ग्रामीण भागातुन त्यांनी विवीध शाखेतून अनेक विद्यार्थी घडविले. त्यांचे विद्यार्थी आज विविध उच्चपदावर कार्यरत आहेत. यावेळी प्रा.बी.एल खोंडे यांनी डॉ बिराजदार सरांबद्दल गौरवोद्गारपर सांगितले की, प्राचार्य म्हणून कार्य करताना डॉ. टी एस बिराजदार एक कुशल प्रशासक व संघटक म्हणून प्रचलित आहेत. डॉ. बिराजदार हे कर्तुत्व संपन्न जीवन-साधनाने प्राध्यापक ते प्राचार्य म्हणून अविरतपणे ३७ वर्षे विद्येची उपासना करीत आले. हा माणूस म्हणजे व्यक्तिगत जीवनात सहजतेने स्नेह जपत, सुसंस्कृत वाणी, वर्तनाची अभिजात संस्कृती जपणारा, निसर्गप्रेमी, प्रसन्नचित निरंतर हसमुख व्यक्तिमत्त्व, ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि अध्यात्मिकतेची जोड लावून संगम निर्माण केला आहे. महाविद्यालयात सरांनी कधीही मोठेपणाचा आव आणला नाही वा, मिरविला असं कदापि पहावयास मिळाले नाही. आम्हा सर्व प्राध्यापक बंधू-भगिनींना व शिक्षकेतर कर्मचारी बांधवांना समतेचा विचारांचा प्रभाव टाकून संस्थेशी एकनिष्ठता व आपल्या कार्यात प्रामाणिक कसे राहावे याबाबतीत प्रभाव टाकून संस्थेत सर्वांना बरोबरीची वागणूक देणारे, व कोणाबद्दल कधीही चुकीच्या शब्द काढला असे तरी मला वाटले नाही. असे प्रा.बी.एल खोंडे यांनी सांगत पुढे म्हणाले की, जीवाला जीव देणारी माणसे मिळवणारा माणुसकीच्या धनी म्हणून प्राचार्य डॉ. टी.एस.बिराजदार हे नाव समोर येतंय..! असेही श्री. खोंडे यांनी सांगितले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प रा सोसायटीचे अध्यक्ष डॉ अरुण कुळकर्णी, डॉ सौ कुळकर्णी, सचिव डॉ मिलिंदजी डहाळे, ज्येष्ठ संचालक अजय पगारिया, प्र.प्राचार्य डॉ के एम पाटील, ग्रंथपाल प्रा पंकज देशमुख, प्रा बी एल खोंडे, प्रा व्ही आर पाटील, डॉ प्रा कांचन महाजन, डॉ. प्रा. एस बी शिंगाणे , वरिष्ठ लिपिक रितेश साळुंखे, प्रयोगशाळा परिचर जितेंद्र परदेशी आदी मान्यवरांच्या वतीने सेवानिवृत्त प्राचार्य डॉ टी एस बिराजदार यांना शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रितेश साळुंखे यांनी तर आभार जितेंद्र परदेशी यांनी मानले. याप्रसंगी प्राध्यापक व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.