बळीरामपेठेत समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष विजय निकमांची पत्रकार परिषद…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयामधील उपचारार्थ दाखल रुग्णांना ‘आहार सेवा’ पुरविण्याचे १२३ कोटीचे कंत्राट मिळाले असून या आहार सेवेच्या नाशिक मंडळातील कामात मोठा अपहार झाला आहे. असा आरोप समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष विजय निकम यांनी बळीरामपेठे येथे शुक्रवारी १५ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता पत्रकार परिषदेत केला आहे.
यावेळी विजय निकम म्हणाले की, नाशिक मंडळातील पाच जिल्ह्यासह जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात दाखल रुग्णांना करण्यात आलेल्या आहार सेवा पुरवठा कामात मोठा अपहार झाला असून या प्रकरणी कंत्राटदार संस्था श्री. छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार संस्था, नाशिक कारवाई होतांना उपसंचालक कार्यालयाकडून टाळा टाळ होत आहे. या संस्थेला राज्यातील १० जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयामधील उपचारार्थ दाखल रुग्णांना ‘आहार सेवा’ पुरविण्याचे जवळपास १२३ कोटीचे कंत्राट मिळाले असून या आहार सेवेच्या नाशिक मंडळातील कामात मोठा अपहार झाला आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाचे नाशिक मंडळाचे संचालक डॉ रघुनाथ भोये व प्रशासकीय अधिकारी एम. जी.लांजेवार हेच या प्रकरणातील ‘मास्टरमाईंड’ असून आहार सेवा पुरविणारी श्री. छत्रपती शिवाजी महाराज स्वयं. रोजगार संस्था, नाशिक या संस्थेवर कारवाई होऊ नये म्हणून प्रयत्न सुरू आहे. या घोटाळ्याची राज्य स्तरावरून चौकशी होऊन फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे, अशी मागणी आमची आहे.