Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगाव महानगरपालिकेच्या १७व्या महापौरपदी दीपमाला काळे, उपमहापौरपदी मनोज चौधरी
    जळगाव

    जळगाव महानगरपालिकेच्या १७व्या महापौरपदी दीपमाला काळे, उपमहापौरपदी मनोज चौधरी

    editor deskBy editor deskFebruary 6, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जळगाव महानगरपालिकेच्या सतराव्या महापौरपदी भारतीय जनता पक्षातर्फे प्रभाग क्रमांक ७ मधून बिनविरोध निवडून आलेल्या दीपमाला मनोज काळे तर उपमहापौरपदी शिवसेना (शिंदे गट) चे मनोज सुरेश चौधरी आज विशेष सभेनंतर विराजमान झाले. पिठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी या निवडीची अधिकृत घोषणा केली.

    महापौर व उपमहापौर पदाची निवड जाहीर होताच महानगरपालिका परिसरात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला. ढोल-ताश्यांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. महापौर पदासाठी दीपमाला काळे यांनी दोन अर्ज दाखल केले होते. त्यापैकी एक अर्ज मागे घेतल्यानंतर त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. दोन्ही पदांसाठी कोणत्याही अन्य पक्षाकडून अर्ज दाखल न झाल्याने ही निवड बिनविरोध पार पडली.

    उपमहापौर पदासाठी शिवसेना शिंदे गटाने निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी देत चौथ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या मनोज सुरेश चौधरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ४६ जागा जिंकत स्पष्ट बहुमत सिद्ध केले होते. मित्र पक्ष शिवसेना शिंदे गटाने २३ पैकी २२ जागांवर विजय मिळवत दुसरा क्रमांक पटकावला. एकूण ७५ पैकी ७० जागांवर महायुतीने विजय मिळवून महानगरपालिकेत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. महापौरपदाचे आरक्षण ओबीसी महिला प्रवर्गासाठी असून, ओबीसी महिला प्रवर्गातून निवडून आलेल्या दीपमाला मनोज काळे यांना ही संधी देण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगावसह ७ महानगरपालिकेत भाजपचे महापौर !

    February 6, 2026

    नशिबाला हरवून यशाला गवसणी; ममता नाकतोडेंची प्रेरणादायी भरारी !

    February 6, 2026

    पोलीस–वन विभागात नोकरी लावण्याचे आमिष; चाळीसगावात ६ लाखांची फसवणूक

    February 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.