जळगाव प्रतिनिधी । चाळीसगाव शहरात राहणाऱ्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून गर्भवती करणाऱ्या नराधमाला जिल्हा न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि ३० हजार रूपयांचा दंडांची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करून गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला होता. याबाबत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात रविंद्र उर्फ रितेश बापु निकुंभ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर रविंद्र निकुंभ याला अटक केली होती. या गुन्ह्याचा खटला जळगाव जिल्हा न्यायालयातील न्या. बी.एस. महाजन यांच्या न्यायालयात चालविण्यात आला. या खटल्यात एकुण १२ साक्षिदार तपासण्यात आले. खटला सुरू असतांना अल्पवयीन मुलगी सज्ञान झाल्याने तिचा विवाह झाला होता. विवाहानंतर तिचा दिर्घ आजाराने मृत्यू झाला आहे. त्यामुळे तिची साक्ष नोंदविला आलेली नव्हती. त्यामुळे यात यात पिडीतेचे वडील, वैद्यकीय अधिकारी व इतर साक्षिदारांची साक्ष महत्वपुर्ण ठरल्या. साक्षीपुराव्याअंती रविंद्र उर्फ रितेश बापू निकुंभ याला दोषी ठरवत विविध कलमान्वये २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि ३० हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. चारूलता बोरसे काम पाहिले, केसवॉच म्हणून दिलीप सत्रे यांनी सहकार्य केले.