Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे जळगाव तालुका अध्यक्षपदी सुमित पाटील व उपाध्यक्षपदी प्रविण पाटील यांची नियुक्ती
    जळगाव

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे जळगाव तालुका अध्यक्षपदी सुमित पाटील व उपाध्यक्षपदी प्रविण पाटील यांची नियुक्ती

    editor deskBy editor deskFebruary 5, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    दिनांक १ फेब्रुवारी रोजी पद्धमालय विश्राम गृह जळगाव येथे गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाची बैठक केंद्रीय अध्यक्ष नरेंद्र कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी व्यासपीठावर केंद्रीय उपाध्यक्ष रवींद्र पवार केंद्रीय महासचिव भगवान सोनार केंद्रीय खजिनदार ललित खरे सदस्य गणेश पाटील जोशीला पगारीया तसेच ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत यादव डॉ दिलीप तिवारी व राजेश यावलकर यांच्यासह नवनियुक्त केंद्रीय कार्यकारिणी पदाधिकारी उपस्थित होते.

    कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गणेशांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी अध्यक्ष नरेंद्र कदम यांनी प्रस्तावना सादर करताना आयोजित बैठकीचे उद्दिष्ट व आपल्या संघटनेचे देय्य धोरण स्पष्ट केले. यावेळी मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनीय भाषणात पत्रकारांच्या अडीअडचणी व त्यांच्यावरील होणाऱ्या अन्यायाचे निराकरण करण्यासाठी स्थापन केलेल्या या गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे कौतुक केले व आपल्या पत्रकार बांधवांच्या अडीअडचणी व होणारे अन्याय या विषयावर सर्वजण संघटनेच्या माध्यमातुन एकजूट होऊन आवाज उठवावा यासाठी संघटना म्हणून आम्ही आपल्या सोबत आहोत.

    यावेळी जेष्ठ पत्रकार डॉ दिलीप तिवारी,चंद्रकांत यादव व राजेश यावलकर ,जोशीला पगारीया व रवींद्र पवार यांनी पत्रकारांच्या समस्येसह पाल्यांच्या शिक्षण,रोजगार व आरोग्याच्या दृष्टीकोनातुन संघटनेच्या माध्यमातुन कार्यरत राहावे असे आवाहन आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून केले.

    या सभेच्या ठिकाणी जळगाव तालुका गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेचे नवनियुक्त जळगाव तालुका अध्यक्ष सुमीत पाटील व उपाध्यक्ष प्रविण पाटील यांच्या नावाची घोषणा करून त्यांना केंद्रीय अध्यक्ष नरेंद्र कदम ,उपाध्यक्ष रवींद्र पवार ,महासचिव भगवान सोनार जळगाव जिल्हा अध्यक्ष चेतन वाणी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले .जळगाव तालुका संघटना वाढीची व बळकटीकरणाची मोठी जबाबदारी नवनियुक्त अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या खांद्यावर देण्यात आली असून पुढील वाटचालीसाठी केंद्रीय व जिल्हा प्रमुख तसेच ज्येष्ठ पत्रकार यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या सूत्रसंचालन भगवान सोनार यांनी केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खळबळजनक : अज्ञात महिलेचा खून करून मृतदेह जाळल्याचा संशय !

    February 5, 2026

    दोन दुचाकीची जबर धडक : दोन तरुण जागीच ठार !

    February 5, 2026

    फिरायच्या बहाण्याने नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल !

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.