लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी बँकेने शेतकऱ्यांना विमा हप्त्याची रक्कम कर्ज म्हणून देण्याचा निर्णय जिल्हा मध्यवर्ती बँकने घेतला असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांनी दिली.
रिंगरोडवरील जिल्हा बँकेच्या सभागृहात जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला उपाध्यक्ष श्यामकांत सोनवणे, माजी मंत्री आ. एकनाथ खडसे, माजी मंत्री डॉ. सतिष पाटील, संचालक संजय पवार, प्रतापराव पाटील, महितापसिंग नाईक, कार्यकारी संचालक तथा व्यवस्थापक जितेंद्र देशमुख यांची उपस्थिती होती.
जिल्हा बॅकेने शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यात कर्जदार शेतकऱ्यांना पीक विम्याची सक्ती करण्यात आली होते. ती सक्ती आता बँकेने ऐच्छीक केली आहे. कर्जदार शेतकऱ्यांना विमाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी बँक शाखेतून संमतीपत्र भरून दिल्यास शेतकऱ्यांना विमा हप्ता बँकेकडून विमा कंपनीकडे भरला जाणार आहे.