लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: राज्य सरकारने जाहीर केल्यानुसार १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोनावरील बुस्टर डोसचे मोफत लसीकरण सुरू झाले आहे. या अनुषंगाने शहरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज रूग्णालयात शुक्रवार १५ जुलै रोजी सकाळी १० वाजेपासून मोफत लसीकरणास प्रारंभ झाला आहे.
शासनाकडून जेष्ठ नारीकांसाठी मोफत बुस्टर डोस देण्यात येत होता.याच धर्तीवर राज्य शासनाने १८ वर्षावरील नागरिकांना आज शुक्रवार दि. १५ जूनपासून बुस्टर डोसचे मोफत लसीकरणास प्रारंभ करण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयांने कोरोनाचा दुसरा डोस आणि बूस्टर डोस यांच्यातील अंतर ९ महिन्यांवरुन ६ महिन्यांवर आणलं आहे. जास्तीत जास्त लोकांनी बुस्टर डोस घ्यावा, या हेतूनं हे अंतर कमी करण्यात आलं आहे. महापालिकेच्या केंद्रांवर कोविशील्ड आणि कोवॅक्सीनच्या बूस्टर डोस उपलब्ध आहेत.
महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी याबाबत अधिक माहिती देतांना सांगिलते आहे की, १८ वर्षावरील सर्व नागरिकांना बुस्टर डोसचे मोफत लसीकरण करण्यास आजपासून महापालिकेच्या केंद्रांवर प्रारंभ झाला आहे. दरम्यान, चेतनदास मेहता रुग्णालयात कोवॅक्सीन तसेच राजश्री छत्रपती शाहू महाराज रुग्णालय व इतर केंद्रांवर कोविशील्डचा बुस्टर डोस उपलब्ध असून जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. राम रावलानी यांनी केले आहे.