Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगावात बेकायदेशीर राहणाऱ्या इराणी महिलेची होणार भारतातून हकालपट्टी !
    क्राईम

    धरणगावात बेकायदेशीर राहणाऱ्या इराणी महिलेची होणार भारतातून हकालपट्टी !

    editor deskBy editor deskFebruary 3, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    वर्षभरापासून धरणाव येथे बेकायदेशीररित्या वास्तव्यास असलेल्या फरनाज हमीद रेझा (वय ३८) या इराणी महिलेसह तिच्या मुलाची भारतातून इराण येथे हकालपट्टी केली जाणार आहे. दि. ५ रोजी तीला जळगावाहून दिल्ली येथे रेल्वेने नेले जाणार असून त्यानंतर दि. ६ रोजी विमानाने तीला इराण येथे रवाना केले जाणार आहे. महिलेसह तिच्या मुलाला पाठविण्यासाठी त्यांचे विमानाचे तिकीटही काढण्यात आले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव येथील कुरेशी मोहल्ल्यात गेल्या वर्षभरापासून इराणी महिला आपल्या मुलासह वास्तव्यास होती. याबाबतची माहिती धरणगाव पोलीसांना मिळताच त्यांनी कुरेशी मोहल्ल्याती एका घरातून तिला ताब्यात घेतले. याप्रकरणी इराणी महिलेला बेकायदेशीररित्या आश्रय देणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली आहे. तर त्या इराणी महिलेची जळगावातील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात रवानगी करण्यात आली.

    बेकायदेशीररित्या राहणाऱ्या त्या इराणी महिलेसह तिच्या मुलाला दि. ६ रोजी दिल्ली येथून विमानाने इराणला रवानगी केली जाणार आहे. त्यापुर्वी दि. ५ रोजी तिला स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जळगावातून दिल्लीला रेल्वेने घेऊन जाणार आहे. त्या महिलेचे इमीग्रेशन होऊन तिला विमानात बसविण्यापर्यंत जळगाव एलसीबीचे पथक महिलेसोबत राहणार आहे. त्या इराणी महिलेची चौकशी केल्यानंतर जिल्हा पोलीस दलाकडून त्या महिलेसह तिच्या मुलाला परत पाठविण्यासाठी इराण दुतावासाशी संपर्क साधून माहिती दिली. त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा होऊन इराण दुतावासाने महिलेला परत बोलविण्याविषयी सकारत्मकता दर्शविली. तसेच तेथील दुतावासाने महिलेचे परतीचे तिकीट काढून दिले.

    त्या महिलेला इराणमध्ये पाठविण्यासाठी जळगाव पोलिस दलाने तयारी सुरू केली होती. परंतू त्या इराणी महिलेला केवळ फारसी व थोडीफार इंग्रजी भाषा येत असल्याने तिच्याकडून माहिती घेताना पोलिसांना अडचण येत होती. त्यामुळे पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड व सहकाऱ्यांनी ट्रान्सलेटरचा आधार घेत त्या महिलेची माहिती जाणून घेतली.

     

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे जळगाव तालुका अध्यक्षपदी सुमित पाटील व उपाध्यक्षपदी प्रविण पाटील यांची नियुक्ती

    February 5, 2026

    खळबळजनक : अज्ञात महिलेचा खून करून मृतदेह जाळल्याचा संशय !

    February 5, 2026

    दोन दुचाकीची जबर धडक : दोन तरुण जागीच ठार !

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.